सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सोमवारी ३९ ने वाढ झाली. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ४५ जण कोरोनामुक्त झाले, तर दोघांचा मृत्यू झाला. प्रशासनाकडून नियमित चाचण्या होत असतानाही बाधितांचे प्रमाण मात्र कमी असल्याने दिलासा मिळत आहे. महापालिका क्षेत्रात केवळ तीन रुग्णांची नोंद होताना सोमवारी सलग चौथ्या दिवशी एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.
गेल्या नऊ दिवसांपासून बाधितांची संख्या सरासरी पन्नासच्या आत आहे. याशिवाय बरे होणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. काही महिन्यांपूर्वी हॉट स्पॉट ठरलेल्या महापालिका क्षेत्रात आता बाधितांचे प्रमाण घटत चालले आहे. मिरज तालुक्यात एकाही नव्या बाधिताची नोंद झाली नाही.
जिल्हा आरोग्य यंत्रणेच्यावतीने सोमवारी दिवसभरात आरटीपीसीआरअंतर्गत ४०८ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात १८ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. तसेच रॅपिड ॲन्टिजेनच्या १४७० नमुन्यांच्या तपासणीतून २२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या ३६७ रुग्णांपैकी ६७ जण ऑक्सिजनवर, तर १६ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यातील एकास कोराेनाची बाधा झाली आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ४७०६१
उपचार घेत असलेले ३६७
कोरोनामुक्त झालेले ४४९८९
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७०५
सोमवारी दिवसभरात...
सांगली २
मिरज १
शिराळा १३
जत ६
खानापूर ४
आटपाडी, कडेगाव ३
पलूस, वाळवा, कवठेमहांकाळ प्रत्येकी २
तासगाव १