विटा : कोरोना संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. रुग्ण संख्या आता आवाक्याबाहेर जाऊ पहात आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या अनेक रुग्णाना सध्या ऑक्सिजन कमी पडू लागला आहे. ऑक्सिजनची टंचाई दूर करण्यासाठी शासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. ऑक्सिजन उपलब्धतेसाठी आता खाजगी रुग्णालयांनी स्वतःचा ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.विटा येथे सोमवारी रात्री ८ वाजता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री पाटील बोलत होते. यावेळी आमदार अनिल बाबर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके, पोलीस उपअधीक्षक अंकुश इंगळे, पोलीस निरीक्षक संतोष डोके, मुख्याधिकारी अतुल पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल लोखंडे डॉ. अविनाश लोखंडे उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करण्याची सूचना प्रशासनाला देऊन होम आयसोलेशनमध्ये असलेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण घराबाहेर पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी, ग्रामपंचायतीने अर्धा रुगणांच्या नावांची यादी ग्रामपंचायतीच्या फलकावर प्रसिद्ध करावी. ग्राम दक्षता समितीने प्रत्येक गावातील शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर सुरू करावे, अशा सूचनाही दिल्या.यावेळी प्रांताधिकारी संतोष भोर यांनी विटा शहरासह खानापूर तालुक्यातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. तर तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी तालुक्यात सुरू असलेल्या कोविड रुग्णालयाची तसेच राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक अंकुश इंगळे यांनी पोलीस बंदोबस्त आणि नाकाबंदीची माहिती बैठकीत दिली. या बैठकीस सर्व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
corona cases in Sangli :खाजगी रुग्णालयांनी स्वतःचा ऑक्सिजन प्लांट उभारावा : जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2021 6:52 PM
CoronaVirus In Sangli : कोरोना संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. रुग्ण संख्या आता आवाक्याबाहेर जाऊ पहात आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या अनेक रुग्णाना सध्या ऑक्सिजन कमी पडू लागला आहे. ऑक्सिजनची टंचाई दूर करण्यासाठी शासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. ऑक्सिजन उपलब्धतेसाठी आता खाजगी रुग्णालयांनी स्वतःचा ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
ठळक मुद्देखाजगी रुग्णालयांनी स्वतःचा ऑक्सिजन प्लांट उभारावा : जयंत पाटील विट्यात कोरोना आढावा बैठक