जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या घटली; मृत्युसत्र कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:20 AM2021-05-28T04:20:53+5:302021-05-28T04:20:53+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत गुरुवारी घट झाली. दिवसभरात १०१० जणांना कोरोनाचे निदान झाले, तर १०६२ जण कोरोनामुक्त झाले ...
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत गुरुवारी घट झाली. दिवसभरात १०१० जणांना कोरोनाचे निदान झाले, तर १०६२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णसंख्या घटली असली तरी मृत्युसत्र कायम असून जिल्ह्यातील ३५ जणांचा मृत्यू झाला. म्युकरमायकोसिसचे दोन नवे रुग्ण आढळून आले, तर दोघांचा मृत्यू झाला.
गेल्या दोन महिन्यांत प्रथमच रुग्णसंख्या हजारावर आली आहे. जिल्ह्यातील ३५ जणांचा मृत्यू झाला असून त्यात सांगली ४, मिरज ५, तासगाव तालुक्यात ८, जत ५, वाळवा ४, खानापूर, शिराळा प्रत्येकी ३, आटपाडी, कडेगाव, कवठेमहांकाळ व मिरज तालुक्यांत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाने आरटीपीसीआर अंतर्गत १८९७ जणांच्या नमुने तपासणीतून ४१७ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. रॅपिड ॲन्टिजनच्या ३७२० जणांच्या नमुने तपासणीतून ६५३ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
जिल्ह्यातील १२ हजार ७८९ जण उपचार घेत असून त्यातील २००२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील १७४५ जण ऑक्सिजनवर, तर व्हेंटिलेटरवर २५७ जण उपचार घेत आहेत.
परजिल्ह्यांतील दोघांचा मृत्यू झाला असून ६० नवे रुग्ण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
चौकट
म्युकरमायकोसिसचे दोन बळी
जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढत असून गुरुवारी निदान होतानाच दोघांचा बळी गेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ११० जणांचे निदान झाले असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ११४२१८
उपचार घेत असलेले १२७८९
कोरोनामुक्त झालेले ९८१२८
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३३०१
गुरुवारी दिवसभरात
सांगली १३०
मिरज ३३
वाळवा १६५
मिरज तालुका १०९
जत १०७
शिराळा १०३
तासगाव ८८
कवठेमहांकाळ ६७
पलूस ६४
खानापूर ६०
आटपाडी ५०
कडेगाव ३४