कोरोना रुग्णांनी स्वयंस्फूर्तीने विलगीकरण केंद्रात यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:20 AM2021-05-29T04:20:47+5:302021-05-29T04:20:47+5:30
कडेगाव : गृह विलगीकरणातील बहुतांशी रुग्णांमुळे कुटुंबातील सदस्यांना आणि परिसरात कोरोनाचा संसर्ग होत आहे. त्यामुळे कोरोना ...
कडेगाव : गृह विलगीकरणातील बहुतांशी रुग्णांमुळे कुटुंबातील
सदस्यांना आणि परिसरात कोरोनाचा संसर्ग होत
आहे. त्यामुळे कोरोना बाधितांनी स्वयंस्फूर्तीने संस्थात्मक विलगीकरण
केंद्रात दाखल व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष
संग्रामसिंह देशमुख यांनी केले.
कडेपूर (ता. कडेगाव) येथील ग्रामपंचायत व पृथ्वी संग्राम ग्रामविकास संस्थेच्या वतीने
जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरू केलेल्या विलगीकरण केंद्राचे लोकार्पण तहसीलदार डॉ. शैलजा पाटील व आरोग्य सेविका राधिका खवळे यांच्याहस्ते झाले. यावेळी देशमुख बोलत होते.
ते म्हणाले की, गावोगावी लोकसहभागातून
संस्थात्मक विलगीकरण
केंद्र सुरू करण्यात
येत आहेत. आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी.
यावेळी सरपंच रूपाली यादव, पृथ्वी संग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब यादव, पंजाबराव यादव, विजय यादव, उपसरपंच
संग्राम यादव, लालासाहेब यादव, रत्नमाला यादव, सूर्याजी यादव उपस्थित होते.
चौकट
कडेपूर केंद्र आदर्शवत ठरेल
कडेपूर येथील ग्रामस्थांनी व आपत्ती व्यवस्थापन समितीने लोकसहभागातून सुरू
केलेले विलगीकरण
केंद्र आदर्शवत ठरेल. येथे दररोज तीन वेळा चहा-नाष्टा, दोन वेळचे जेवण, पौष्टिक अन्न, वैद्यकीय तपासणी
अशा सर्व सुविधा आहेत, असे देशमुख यांनी सांगितले.