corona in sangli : सांगली जिल्ह्यात आणखी दोघांना कोरोना, संख्या आठ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 04:30 PM2020-05-08T16:30:36+5:302020-05-08T16:32:30+5:30
सांगली जिल्ह्यात आणखी दोघांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांच्या संख्येत दोनने वाढ झाली आहे. दरम्यान, आजच दोन रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या अवघी आठच आहे.
सांगली : सांगली जिल्ह्यात आणखी दोघांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांच्या संख्येत दोनने वाढ झाली आहे. दरम्यान, आजच दोन रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या अवघी आठच आहे.
सांगली येथील रेव्हिन्यू कॉलनी येथे मुंबईवरून बेकायदेशीरपणे आलेल्या एकाचा स्वाब तपासणीसाठी 6 मे रोजी घेण्यात आला होता. तर जत तालुक्यातील अंकले येथील मुंबईवरुन आलेल्या एकाचा 7 मे रोजी स्वाब तपासणीसाठी घेण्यात आला होता. या दोघांचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
या दोघांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग गतीने करण्यात येत असून आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात येत आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
सांगली जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आठच असणार आहे, कारण जिल्ह्यातील दोन कोरोनाबाधितांचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे, त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आठवरच कायम असणार आहे.