कडेगाव शहरातून कोरोना लसीकरण जनजागृती फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:28 AM2021-04-07T04:28:06+5:302021-04-07T04:28:06+5:30

शहरातून कोरोना लसीकरण जनजागृती फेरी काढण्यात आली. तसेच ४५ वर्षावरील सर्व नागरिकांनी तत्काळ लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन यावेळी ...

Corona vaccination awareness round from Kadegaon city | कडेगाव शहरातून कोरोना लसीकरण जनजागृती फेरी

कडेगाव शहरातून कोरोना लसीकरण जनजागृती फेरी

Next

शहरातून कोरोना लसीकरण जनजागृती फेरी काढण्यात आली. तसेच ४५ वर्षावरील सर्व नागरिकांनी तत्काळ लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन यावेळी नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आले.

मंगळवारी सकाळी अकरा वाजता येथील राममंदिरापासून या जनजागृती फेरीला सुरुवात झाली. त्यानंतर आझाद चौक, चावडी चौक, शिवाजी चौक तसेच मुख्य बाजार पेठ यासह शहरातील प्रमुख चौकातून ही जनजागृती फेरी काढण्यात आली. येथील ग्रामीण रुग्णालयात या जनजागृती फेरीची सांगता झाली.

यावेळी शहरातील काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते, नगरपंचायतीचे नगरसेवक व मुख्याधिकारी यांनी येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड प्रतिबंध लसीकरण सेंटरची पाहणी केली. तसेच लसीकरण करण्यास आलेल्या नागरिकांना बसण्याची व्यवस्था वाढवण्याची सूचना केली. येथील परिसराची तातडीने नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागामार्फत स्वच्छता करण्यात आली. लसीकरण करण्यासाठी आलेल्या नागरिकांना स्वच्छ थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली.

यावेळी मुख्याधिकारी कपिल जगताप, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेशचंद्र थोरात, सोनहिराचे संचालक दीपक भोसले, विजय शिंदे, माजी नगराध्यक्षा नीता देसाई, नगरसेविका संगीता राऊत, संगीता जाधव, रिजवाना मुल्ला, दिनकर जाधव, साजिद पाटील, श्रीरंग माळी, शशिकांत रासकर, विजयराव जाधव, डॉ. देशचौगुले आदी उपस्थित होते.

Web Title: Corona vaccination awareness round from Kadegaon city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.