corona virus : सांगलीत सफाई कामगाराचा कोरोनाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 03:15 PM2020-07-27T15:15:23+5:302020-07-27T15:16:37+5:30
सांगली जिल्हा परिषदेनंतर आता सांगली महापालिकेत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सोमवारी कुपवाड विभागाकडे सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या ५४ वर्षे व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला. यामुळे महापालिकेची यंत्रणा हादरून गेली आहे.
सांगली : जिल्हा परिषदेनंतर आता सांगली महापालिकेत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सोमवारी कुपवाड विभागाकडे सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या ५४ वर्षे व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला. यामुळे महापालिकेची यंत्रणा हादरून गेली आहे.
संबंधित सफाई कामगार सांगलीतील मद्रासी गल्ली येथे राहण्यास होता. तो कुपवाड विभागात कार्यरत होता. त्याला रविवारी सायंकाळी त्रास जाणवू लागल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सोमवारी पहाटे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा स्बाब घेण्यात आला होता. त्याचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाने कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच महापालिकेच्या यंत्रणेत खळबळ उडाली.
मद्रासी गल्ली परिसरात महापालिकेने औषध फवारणी केली. त्यांच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान महापालिकेने आजपासून कर्मचार्यांची रॅपिड अँटीजेन चाचणी सुरु केली आहे. त्यासाठी सांगली व मिरजेत स्वतंत्र केंद्र उभारले आहे.