जिल्ह्यात कोरोनाचा कहर; १७ जणांचा मृत्यू; ९२१ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:28 AM2021-04-16T04:28:16+5:302021-04-16T04:28:16+5:30

सांगली : जिल्ह्यातील कोरोनास्थिती अधिक चिंताजनक होत असून, गुरूवारी दिवसभरात तब्बल १७ जणांचा मृत्यू झाला, तर ९२१ जणांना कोरोनाचे ...

Corona's havoc in the district; 17 killed; 921 new patients | जिल्ह्यात कोरोनाचा कहर; १७ जणांचा मृत्यू; ९२१ नवे रुग्ण

जिल्ह्यात कोरोनाचा कहर; १७ जणांचा मृत्यू; ९२१ नवे रुग्ण

Next

सांगली : जिल्ह्यातील कोरोनास्थिती अधिक चिंताजनक होत असून, गुरूवारी दिवसभरात तब्बल १७ जणांचा मृत्यू झाला, तर ९२१ जणांना कोरोनाचे निदान झाले. वाळवा तालुका कोरोनाचा ‘हॉट स्पॉट’ ठरत असून सर्वाधिक १७९ जणांना लागण होत पाचजणांचा मृत्यू झाला आहे. २४५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच एकाचवेळी महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागातही रुग्ण वाढत आहेत. वाळवा तालुक्यात विक्रमी संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. गुरुवारी १७ जणांचा मृत्यू झाला त्यात वाळवा तालुक्यातील ५, खानापूर ३, मिरज व पलूस प्रत्येकी २ तर मिरज शहर, जत, कडेगाव, कवठेमहांकाळ आणि शिराळा तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाच्यावतीने गुरुवारी आरटीपीसीआर अंतर्गत २३९३ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात ५८७ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. रॅपिड ॲन्टिजेनच्या १७०६ तपासणीतून ३६५ जण बाधित आढळले आहेत.

जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णसंख्या सध्या वाढत आहेत. सध्या ५५२८ जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यातील ७३७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यात ६५१ जण ऑक्सिजनवर तर ८६ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. बाहेरच्या जिल्ह्यातील ३१ जण पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ५८४२०

उपचार घेत असलेले ५५२८

कोरोनामुक्त झालेेले ५१००३

आतापर्यंतचे एकूण मृत्यू १८८९

गुरुवारी दिवसभरात

सांगली १३०

मिरज ६३

वाळवा १७९

खानापूर ९०

मिरज, कडेगाव प्रत्येकी ८६

जत ८४

तासगाव ६१

कवठेमहांकाळ ४९

आटपाडी ३८

पलूस ३३

शिराळा २२

Web Title: Corona's havoc in the district; 17 killed; 921 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.