पेठ परिसरात कोरोनाचा प्रभाव वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:27 AM2021-05-08T04:27:47+5:302021-05-08T04:27:47+5:30
पेठ : पेठ (ता. वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोरोनाचा वाढता प्रभाव दिसून येत आहे. यामुळे दक्षता समिती, ग्रामपंचायत, ...
पेठ : पेठ (ता. वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोरोनाचा वाढता प्रभाव दिसून येत आहे. यामुळे दक्षता समिती, ग्रामपंचायत, शासकीय तलाठी, ग्रामसेवक यांनी गावात कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागतात याकडे लक्ष केंद्रित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ११ गावे येतात. यामध्ये २६२ कोरोना रुग्ण असून, १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ११३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आरोग्य केंद्रांतर्गत पेठ यथे ८७, रेठरेधरण येथे ९६, सुरूल येथे ९, ओझडे येथे ४, नायकलवाडी येथे ३, घबकवाडी येथे १, जांभूळवाडी येथे १३, वाघवाडी येथे ८, मळनाथपूर येथे १७, महादेवाडी येथे १४, माणिकवाडी येथे १० रुग्ण आहेत. हे सर्व जण घरी उपचार घेत आहेत. काही गावांमध्ये बाधित रुग्ण सार्वजनिक ठिकाणी फिरत असताना दिसून येत आहेत. यामुळे संसर्ग वाढण्याची भीती आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊनचे नियम नागरिकांनी काटेकोर पालन केल्यास कोरोनाला आळा बसेल. तरी दक्षता समिती, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सर्व गावांत पेठ केंद्रामधील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी वर्ग, आशा सेविका यांच्यामार्फत अखंड सेवा उपलब्ध करून दिली जात आहे.