फोटो ओळी : नागज (ता. कवठेमहंकाळ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रा. शशिकांत पोरे यांनी सत्कार केला. या वेळी एम.एस. माळी, बी.डी. जाधव उपस्थित होते.
घाटनांद्रे : कोरोनाबाधित व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांकडे समाजात उपेक्षित नजरेने पाहिले जाते, त्यांच्यावर विलगीकरण काळात एकप्रकारे अघोषित बहिष्कार टाकला जातो, ही एक खरंच चिंतेची बाब असून अशा वेळी या कुटुंबांना खऱ्या अर्थाने मदतीची व सहानुभूतीची गरज आसते. या वेळी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे येणे गरजेचे आसल्याचे मत प्रा. शशिकांत पोरे यांनी व्यक्त केले.
नागज (ता. कवठेमहंकाळ) येथील आरोग्य उपकेंद्रात जागतिक परिचारिका दिनानिमित्त आयोजित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन नागज येथील निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी केले होते.
या वेळी विकास संस्थेचे उपाध्यक्ष विठ्ठल कोरे, ग्रामविकास अधिकारी बी.डी. जाधव, गावकामगार तलाठी एम.एस. माळी, डॉ. निशिकांत तांदळे, मंजुषा साळुंखे, अरुणा रूपनर, अर्चना रूपनर, मंगल चव्हाण, शोभा सुतार, प्रतीक पोरे आदी उपस्थित होते.