कोर्ट ऑफ द टेबल आंतरराष्ट्रीय बहुमानाबद्दल सविता चव्हाण यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:26 AM2021-03-06T04:26:12+5:302021-03-06T04:26:12+5:30

ओळ : तासगाव येथील गुंतवणूक व आर्थिक सल्लागार सविता चव्हाण यांचा सत्कार खासदार संजयकाका पाटील यांनी केला. यावेळी अविनाश ...

Court of the Table felicitates Savita Chavan for international honors | कोर्ट ऑफ द टेबल आंतरराष्ट्रीय बहुमानाबद्दल सविता चव्हाण यांचा सत्कार

कोर्ट ऑफ द टेबल आंतरराष्ट्रीय बहुमानाबद्दल सविता चव्हाण यांचा सत्कार

Next

ओळ : तासगाव येथील गुंतवणूक व आर्थिक सल्लागार सविता चव्हाण यांचा सत्कार खासदार संजयकाका पाटील यांनी केला. यावेळी अविनाश चव्हाण, नितीन पाटील, राजेंद्र मेढेकर उपस्थित हाेते.

मिरज : तासगाव येथील गुंतवणूक व आर्थिक सल्लागार सविता चव्हाण यांना कोर्ट ऑफ टेबल हा आंतरराष्ट्रीय बहुमान मिळाल्याबद्दल खासदार संजयकाका पाटील यांनी सत्कार केला.

सविता चव्हाण यांचे आर्थिक नियोजन क्षेत्रातील काम प्रशंसनीय असल्याने त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतल्याचे व सविता चव्हाण यांना कोर्ट ऑफ द टेबल हा आंतरराष्ट्रीय बहुमान ही सांगली जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे प्रतिपादन खासदार संजयकाका पाटील यांनी केले.

नितीन पाटील म्हणाले, अमेरिकेतील मिलियन डॉलर राऊंड टेबल ही संस्था आर्थिक सल्लागारांची जागतिक दर्जाची संघटना आहे. संस्थेचे जगातील ७० देशातील सुमारे ७२ हजारपेक्षा अधिक सदस्य आहेत. आर्थिक क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जगातील मोजक्या प्रतिनिधींची या परिषदेसाठी निवड होते. याप्रसंगी एचडीएफसी लाइफचे नितीन पाटील, केंद्रीय जीएसटीचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मेढेकर उपस्थित होते. सविता चव्हाण यांनी पहिल्या वर्षी मिलियन डॉलर राऊंड टेबल व दुसऱ्या वर्षी कोर्ट ऑफ दि टेबल हा बहुमान मिळवला आहे. गुंतवणूकदारांच्या विश्वासाबद्दल सविता चव्हाण यांनी आभार मानले. सविता चव्हाण यांना खासदार संजयकाका पाटील, आमदार सुमनताई पाटील, एचडीएफसी लाइफचे प्रणव वाघमारे, अभिनंदन पाटील, नितीन पाटील, केंद्रीय जीएसटी निरीक्षक राजेंद्र मेढेकर, राम पाटील, प्रशांत साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Court of the Table felicitates Savita Chavan for international honors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.