लेडीज हॉस्टेलचे अवघ्या पाच दिवसात कोविड हॉस्पिटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:27 AM2021-05-08T04:27:34+5:302021-05-08T04:27:34+5:30
सांगली : श्री भगवान महावीर कोरोना हॉस्पिटलचे मुख्य समन्वयक व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी सांगलीतील श्रीमती कस्तुरबाई ...
सांगली : श्री भगवान महावीर कोरोना हॉस्पिटलचे मुख्य समन्वयक व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी सांगलीतील श्रीमती कस्तुरबाई वालचंद मुलींच्या वसतिगृहाचे अवघ्या पाच दिवसांमध्ये हॉस्पिटलमध्ये रूपांतर केले.
अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी युक्त ४० बेडची सुविधा या हॉस्पिटलमध्ये आहे. गेल्यावर्षी समस्त जैन समाजातील दानशूर व्यक्तींनी दिलेल्या मदतीतून ७५ लाखांची वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यात आली होती. ४० बेड्सची सुविधा असलेल्या या हॉस्पिटलमध्ये १५ बेड्स आयसीयू व्हेंटिलेटर व हायफ्लो नोझलयुक्त तसेच २० ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. हॉस्पिटलच्या ऑक्सिजन फिटिंगसाठी सुनील कोथळे, इलेक्ट्रिक सुविधासाठी रमेश खोत, सागर जोशी, ऑक्सिजन व्यवस्थेसाठी अशोक शिंदे आणि अमोल चोगुले यांनी तसेच संजय आवटी, डॉ. दिनेश भबान यांनी जबाबदारी स्वीकारत हातभार लावला आहे. डॉ. बी. एस. पाटील, डॉ. राहुल पाटील, डॉ. अमोल पाटील, डॉ. प्रीतम आडसुळे, डॉ. अमोल सकळे व इतर १५ डॉक्टर्स, २० नर्सेस, ५ क्लिनिंग स्टाफ, ५ मॅनेजमेंट स्टाफ अशा एकूण ४० स्टाफचे योगदान लाभले आहे, असे सुरेश पाटील यांनी सांगितले.
कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात अवघ्या दहा दिवसात १०० रुग्ण दाखल झाले त्यापैकी ८० रुग्णांनी यशस्वी मात केली आहे.
सुरेश पाटील म्हणाले, जैन समाजातील दानशूर व्यक्ती तसेच सुभाष बेदमुथा, जितेंद्र नाणेशा, अजित पाचोरे, राजगोंडा पाटील, वसंत पाटील, सुभाष देसाई यांचे सहकार्य लाभले आहे. २२ खोल्यांमध्ये स्वतंत्र टॉयलेट, बाथरूमची सोय आहे. रुग्णांना संपूर्ण पौष्टिक नास्टा आणि जेवण, काढा, हळदी दूध याची मोफत व्यवस्था केली जाते.