पांढरेवाडीत युवकाच्या पुढाकाराने दुग्ध व्यवसाय तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:26 AM2021-04-24T04:26:12+5:302021-04-24T04:26:12+5:30

फोटो-२३दिघंची१ लोकमत न्यूज नेटवर्क दिघंची : पांढरेवाडी (ता. आटपाडी) येथील विशाल हणमंत भूशारी या युवकाच्या पुढाकाराने दुग्ध व्यवसायाला चालना ...

Dairy business booms in Pandharewadi with youth initiative | पांढरेवाडीत युवकाच्या पुढाकाराने दुग्ध व्यवसाय तेजीत

पांढरेवाडीत युवकाच्या पुढाकाराने दुग्ध व्यवसाय तेजीत

Next

फोटो-२३दिघंची१

लोकमत न्यूज नेटवर्क

दिघंची : पांढरेवाडी (ता. आटपाडी) येथील विशाल हणमंत भूशारी या युवकाच्या पुढाकाराने दुग्ध व्यवसायाला चालना मिळाली आहे. दुग्ध व्यवसाय सुरू केला तेव्हा ४०० ते ५०० लीटर दूध प्रतिदिवस होते; तर आता व्यवसायात मोठी वाढ झाली असून प्रतिदिवस २५०० ते २७०० लीटर दुग्ध उत्पादन पोहोचले आहे.

तालुक्यातील दिघंची, पुजारवाडी, पांढरेवाडी, भवानीमळा, उंबरगाव हा भाग दुग्ध व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. भूशारी यांनी गेल्या वर्षापूर्वी दुग्ध व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात पदार्पण केले तेव्हा त्यांना डेअरीसाठी अपेक्षित दूध मिळत नव्हते. या भागात लहानमोठ्या नऊ ते दहा दूध डेअ-या आहेत. भूशारी यांनी शेतकऱ्यांना जोडव्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन केल्यामुळे या भागातील दुधाळ जनावरे पाळणाऱ्यांची संख्याही वाढली. भूशारी यांच्या डेअरीवर चांगला भाव मिळत आहे. या भागात दररोज चार ते पाच हजार लीटर दुधाची आवक होत आहे.

कोट

सध्या प्रतिदिवस २५०० ते २७०० लीटर दुधाची आवक होत आहे. शेतकऱ्यांना गायी खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करत आहे. त्यामुळे या भागात दुधाळ जनावरांची संख्या वाढली आहे. तर, भविष्यात दुग्धजन्य पदार्थ बनवणार आहे.

- विशाल भूशारी, दूध डेअरीमालक

Web Title: Dairy business booms in Pandharewadi with youth initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.