राज्यातील आदिवासींना खावटी वाटपाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:30 AM2021-03-01T04:30:12+5:302021-03-01T04:30:12+5:30
शिराळा : राज्यातील ११ लाख ५५ हजार गरीब आदिवासी बांधवांना तत्काळ खावटी वाटप करावे, अशी मागणी बिरसा क्रांती दलाचे ...
शिराळा : राज्यातील ११ लाख ५५ हजार गरीब आदिवासी बांधवांना तत्काळ खावटी वाटप करावे, अशी मागणी बिरसा क्रांती दलाचे राजेंद्र पाडवी यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी विकासमंत्री यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, देशभरात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू केले होते. यामुळे सर्व कामे बंद असल्याने अनुसूचित जमातींच्या कुटुंबास अन्नधान्याची उपलब्धता व त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये अनुसूचित जमातींच्या कुटुंबीयांना न्याय देण्याच्या दृष्टीने राज्यशासनाने त्वरित पावले उचलावीत. अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना मदत करावी म्हणून सन १९७८ पासून सुरू असलेली, पण २०१३-१४ पासून बंद असलेली खावटी योजना पुनर्जीवित करण्यात आली. आता आणखी दुसराही लाॅकडाऊन होण्याचे संकेत मिळत आहे. तरी गरीब आदिवासी बांधवांना मात्र वस्तू स्वरूपात दोन हजार रुपये मिळाले नाहीत. यामुळे आदिवासी बांधवांना खावटी अनुदानाचे वाटप करावे, अशी मागणी बिरसा क्रांती दलाने केली आहे.