सांगली : मागासवर्गीयांचे ३३ टक्के आरक्षण रद्द केल्याचा अध्यादेश मागे घेण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाने केली आहे. अन्यथा रस्त्यावर येण्याचा इशारा दिला आहे. मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षण रद्द करून सर्व पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचा अध्यादेश ७ मे रोजी काढण्यात आला आहे.
याबाबत महासंघाने राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण टिकविण्यासाठी राज्य सरकार तयारी करताना दिसत नाही. लाखो मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची पदोन्नती अधांतरी ठेवली गेली आहे. २०१७ पासून ते वंचित आहेत. नव्या निर्णयानुसार मागासवर्गीयांची पदोन्नतीची ३३ टक्के आरक्षित पदे रिक्त न ठेवता पदोन्नतीची सर्व सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचे आदेश आहेत. त्यामुळे मागासवर्गीयांवर अन्याय होणार आहे. शासनाने अध्यादेश मागे घेऊन अन्याय दूर करावा, अन्यथा ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभरात आंदोलन करावे लागेल.