इस्लामपूर : वटपौर्णिमेनिमित्त येथील मुक्तांगण प्ले स्कूलतर्फे वडाच्या शंभर रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी संचालिका वर्षाराणी मोहिते म्हणाल्या, वटपौर्णिमेचे औचित्य साधून ही रोपे भेट दिली आहेत. महिला पोलीस अधिकारी पोलीस कवायत मैदानाच्या बाजूने झाडे लावून संगोपन करणार आहेत. उर्वरित ५० झाडे व्यक्तिगत पातळीवर महिलांना दिली आहेत. या महिला वटपौर्णिमेनिमित्त रोपांचे पूजन करतील आणि हे रोप संवर्धित करतील.
साक्षी ग्रुप, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, पोलीस मित्र महिला संघटना, जायंट्स ग्रुप ऑफ सहेली यांना रोपे देण्यात आली. यावेळी बांधकाम सभापती सुनीता सपकाळ, रोझा किणीकर, संगीता शहा, चारुशीला फल्ले, पुष्पलता खरात उपस्थित होत्या. सरोजनी मोहिते यांनी स्वागत केले.
फोटो-
इस्लामपूर येथे मुक्तांगण स्कूलच्यावतीने वर्षाराणी मोहिते यांनी वडाची रोपे भेट दिली. यावेळी सुनीता सपकाळ, पुष्पलता खरात, संगीता शहा उपस्थित होत्या.