डालमिया कारखान्याकडून पूरग्रस्तांना साहित्यवाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:26 AM2021-09-25T04:26:34+5:302021-09-25T04:26:34+5:30
कोकरुड : डालमिया भारत शुगर इंडस्ट्रीज लि. (निनाईदेवी युनिट) मार्फत मणदूर, सोनवडे, खोतवाडी, आरळा, इनामवाडी, मराठेवाडी ...
कोकरुड : डालमिया भारत शुगर इंडस्ट्रीज लि. (निनाईदेवी युनिट) मार्फत मणदूर, सोनवडे, खोतवाडी, आरळा, इनामवाडी, मराठेवाडी व मोहरे या पूरग्रस्त गावातील लोकांना संसारोपयोगी वस्तू तसेच गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
शिवाजी पाटील म्हणाले, डालमिया भारत शुगर निनाईदेवी युनिटचा सामाजिक उपक्रमामध्ये मोठा सहभाग आहे. यावेळी युनिट हेड संतोष कुंभार म्हणाले, शैक्षणिक सुविधासोबत क्रीडा साहित्याच्या पूर्ततेसाठी डालमिया साखर कारखान्याची सकारात्मक भूमिका राहील.
कार्यक्रमात हुतात्मा नानकसिंग हायस्कूलचे मुख्याध्यापक गायकवाड सर व गांधी सेवाधाम हायस्कूलचे क्रीडाशिक्षक सुधीर बंडकर यांनी डालमिया भारत शुगर इंडस्ट्रीज निनाईदेवीच्या विविध सामजिक व शैक्षणिक उपक्रमांबाबत आभार व्यक्त केले.
या उपक्रमासाठी कारखान्याचे युनिट हेड संतोष कुंभार, शेती अधिकारी मनोहर मिसाळ, एच.आर. ॲडमिन ऑफिसर शिवाजी पाटील, युनियनचे अध्यक्ष निवृत्ती नायकवडी, श्रीराम कोडगुले, प्रकल्प समन्वयक सुनील कांबळे, सरपंच ग्रामस्थ व शिक्षक उपस्थित होते.