लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कमी पाणी पिण्यामुळे जसे शरिराला धोके निर्माण होतात, तसेच जास्त प्रमाणात पाणी पिणेही तितकेच अपायकारक ठरते. त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते योग्य प्रमाणात पाणी पिणे केव्हाही चांगले. शरिराची पाण्याची गरज, आरोग्याची स्थिती याचा विचार करुन पिण्याच्या पाण्याचे प्रमाण ठरवता येते. त्यामुळे कुणीही सांगितले म्हणून अतिप्रमाणात पाणी पिणे टाळायला हवे, अन्यथा अनेक अपाय शरिराला होऊ शकतात.
चौकट
शरिरात पाणी कमी पडले तर
डोळे कोरडे व लाल होणे, लघवी झाल्यानंतर जळजळ किंवा खाज सुटण्याची समस्या, रक्तामध्ये ऑक्सिजनची कमतरता, कार्बन डायऑक्साईडची पातळी वाढणे, तोंड कोरडे होणे, घाम कमी येणे, निर्जलीकरण कमी होणे, बद्धकोष्ठता अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
चौकट
शरिरात पाणी जास्त झाले तर
जास्त पाणी पिल्याने ओव्हर-हायड्रेशन होते. यामुळे उलटी होणे, डोकेदुखी, मानसिक स्थिती बिघडणे, भ्रम किंवा विचलन अशा समस्या निर्माण होऊ शकतात. ओव्हर-हायड्रेशनचा थेट परिणाम आपल्या किडनीवरही होतो.
चौकट
कोणी किती पाणी प्यावे
वयोगट दिवसाला किती पाणी (लीटर)
नवजात ०.७
१ ते ३ वर्षे १.३
४ ते ८ १.७
९ ते १३ २.४
१८ पुढील पुरुष ३.७
१८ पुढील महिला २.७
गर्भवती महिला ३
चौकट
या गोष्टीही जलप्राशनासाठी महत्त्वाच्या
निरोगी शरिरासाठी अडीच ते तीन लीटर प्रतिदिन पाणी पुरेसे आहे. यात चहा, कॉफी आणि ज्यूस अशा गोष्टींचा समावेशही करता येतो. शारीरिक काम करणाऱ्यांसाठी अधिक प्रमाणात द्रव शरिरात घ्यावे लागते. दिवसातून १० ते १२ ग्लास पाणी पिणे आदर्श मानलं जातं. व्यक्तीची उंची, वजन, व्यायामाची पद्धत यावरुन पाण्याच्या प्रमाणात वाढ होऊ शकते.
कोट
पाच लीटरपर्यंत शरिराला पाणी पुरेसे आहे. कोमट पाणी पिणेही आरोग्याला चांगलेच आहे. शुद्ध व पुरेशा प्रमाणातील पाणी आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी ठरु शकते.
- डॉ. अनिल कबाडे, युरॉलॉजिस्ट, सांगली