मिरजमधील नऊ गावांना दुष्काळाचा जबर फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 03:36 PM2019-05-22T15:36:26+5:302019-05-22T15:37:02+5:30

म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्यातील अधिकाºयांंच्या ढिसाळ कारभारामुळे मिरज तालुक्यातील दुष्काळसदृश भोसे, सोनी, पाटगाव, सिध्देवाडी, कळंबी, मानमोडी, कांचनपूर, रसूलवाडी, सांबरवाडी या गावांना पाणी टंचाईचा मोठा फटका बसला आहे.  म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याचा फार्स झाल्याने सांबरवाडीतील शंभर

Due to drought, 9 villages in Miraj have suffered heavy casualties | मिरजमधील नऊ गावांना दुष्काळाचा जबर फटका

मिरजमधील नऊ गावांना दुष्काळाचा जबर फटका

googlenewsNext

मिरज : म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्यातील अधिकाºयांंच्या ढिसाळ कारभारामुळे मिरज तालुक्यातील दुष्काळसदृश भोसे, सोनी, पाटगाव, सिध्देवाडी, कळंबी, मानमोडी, कांचनपूर, रसूलवाडी, सांबरवाडी या गावांना पाणी टंचाईचा मोठा फटका बसला आहे. 
म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याचा फार्स झाल्याने सांबरवाडीतील शंभर एकरावरील  ऊस करपून शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाºयाचा प्रश्न गंभीर बनल्याने मिरज पंचायत समितीचे उपसभापती विक्रम पाटील यांनी पाणीबाणीच्या संकटात सापडलेल्या दुष्काळी गावांचा नुकताच पाहणी दौरा केला. शासनाच्या दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांवर ग्रामस्थांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.

मिरज तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांच्या उपाययोजनेत ढिलाई झाल्याने त्याचा फटका दुष्काळी गावांना बसला. शासनाने दुष्काळी गावातील पाणी टंचाई निवारणासाठी म्हैसाळ योजनेतून तलाव, बंधारे भरून घेण्याचे आदेश दिले असताना, हे आदेश कागदावरच राहिले          आहेत. प्रत्यक्षात नियम, अटींचा निकष लावत तलाव व बंधाºयात पाणी सोडले नाही. पर्यायाने कूपनलिका, विहिरींचे पाणी स्रोत वाढले नाहीत. याचा फटका भोसे, सोनी, पाटगाव  सिध्देवाडी, कळंबी, कांचनपूर, रसूलवाडी, मानमोडी, सांबरवाडी या गावांना बसला आहे. सध्या या गावात पिण्याच्या पाण्याअभावी जनावरांच्या चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी टंचाईने ग्रामस्थ त्रस्त आहेत. पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लगत आहे. जनावरांचे हाल होत असून त्यांना चाºयाअभावी बजारात विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.

 

Web Title: Due to drought, 9 villages in Miraj have suffered heavy casualties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.