आजच्या काळात शैक्षणिक गुणवत्ता गरजेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:31 AM2021-09-07T04:31:39+5:302021-09-07T04:31:39+5:30

कामेरी : शिक्षण क्षेत्रामध्ये होणारे आमूलाग्र बदल आत्मसात करून शिक्षकांनी अध्यापनात अद्यावत तंत्रज्ञान वापरणे गरजेचे आहे. तरच ते गुणवत्तापूर्ण ...

Educational quality is needed nowadays | आजच्या काळात शैक्षणिक गुणवत्ता गरजेची

आजच्या काळात शैक्षणिक गुणवत्ता गरजेची

Next

कामेरी : शिक्षण क्षेत्रामध्ये होणारे आमूलाग्र बदल आत्मसात करून शिक्षकांनी अध्यापनात अद्यावत तंत्रज्ञान वापरणे गरजेचे आहे. तरच ते गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवू शकतील. कारण गुणवत्ते शिवाय शिक्षण हे शिक्षण असूच शकत नाही, असे प्रतिपादन जेष्ठ समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन यांनी केले.

येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील जय किसान मंडळातर्फे आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात ते बोलत होते. माजी आमदार भगवानराव साळुंखे अध्यक्षस्थानी होते.

भगवानराव साळुंखे यांनी कालच्या शिक्षणात आणि आजच्या शिक्षणात बराच फरक पडला आहे. कारण जसा शिक्षक बदलला तशा शिक्षणाच्या पद्धती देखील बदलल्या आणि त्याचाच परिणाम आज घडणाऱ्या गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून दिसून येत आहे, असे सांगितले.

प्रा. शामराव पाटील व प्रा. प्रदीप पाटील यांचा सत्कार करण्यात आला. शिवाजी पाटील, प्रा. राजमती पाटील, नामदेव शेवाळे, नागेश भोसले, प्रा. अशोक शिंदे, तेजस्विनी महाडिक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डी. जी. कणसे, जिल्हा परिषद सदस्या राजश्री एटम, दि. बा. पाटील, आनंदराव पाटील, प्रा. दीपक स्वामी, कालिदास पाटील उपस्थित होते. प्रा. डॉ. दीपक स्वामी यांनी स्वागत केले. प्रा. स्वप्निल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. शंकर पाटील यांनी आभार मांनले.

Web Title: Educational quality is needed nowadays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.