बदलते हवामान हापूससाठी परिणामकारक

By admin | Published: December 14, 2015 11:52 PM2015-12-14T23:52:43+5:302015-12-15T00:40:10+5:30

मुराद बुरोंडकर : दिल्लीत वनस्पती शरिर क्रिया शास्त्राबाबत आंतरराष्ट्रीय परिषद

Effective for changing weather conditions | बदलते हवामान हापूससाठी परिणामकारक

बदलते हवामान हापूससाठी परिणामकारक

Next

दापोली : कोकणातील बदलते हवामान हापूसला घातक असून, वातावरणात वारंवार होणाऱ्या बदलामुळे हापूस आंबा पिकाच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. वनस्पती शास्त्राशी निगडीत अभ्यासाची गरज असल्याचे मत वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मुराद बुरोंडकर यांनी व्यक्त केले. वनस्पती शरीरक्रिया शास्त्र या विषयाच्या तिसऱ्या जागतिक परिषदेत दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विश्व विद्यालयात सोमवारी झालेल्या परिषदेत ते बोलत होते.दिल्ली येथे जागतिक वनस्पती शरीरक्रिया शास्त्र परिषद ११ ते १४ डिसेंबरदरम्यान संपन्न झाली. या आंतरराष्ट्रीय परिषदेत जगातील २० राष्ट्रांच्या शास्त्रज्ञांनी सहभाग घेतला होता. या परिषदेत ७०० शास्त्रज्ञ प्रतिनिधी, विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता.दिल्लीतील या आंतरराष्ट्रीय परिषदेकरिता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मुराद बुरोंडकर, डॉ. नितीन गोखले, डॉ. अविनाश शिंदे, प्रा. महेश कुलकर्णी, डॉ. अरुण माने यांची निवड करण्यात आली होती. बदलते हवामान आणि पुढील दिशा या विषयावर वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मुराद बुरोंडकर यांनी या परिषदेत व्याख्यान दिले. परिषदेतील व्याख्याते म्हणून डॉ. बुरोंडकर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कोकणातील बदलते हवामान व हापूसवर होणारा परिणाम हे संशोधन त्यांनी या परिषदेत मांडले.वनस्पती जीवनशास्त्रातील बदलते हवामान व भविष्यातील आव्हाने यासाठी वनस्पती शास्त्रज्ञांनी एकत्र येण्याची गरज आहे. शास्त्रज्ञाने बदलत्या हवामानाचा सामना करण्यासाठी संशोधनातून मात करण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचा सूर या परिषदेत शास्त्रज्ञांनी काढला. वनस्पती जीवशास्त्रातील हवामानाच्या बदलामुळे येणाऱ्या अडथळ्याचा सक्षमपणे सामना करण्याचे आव्हान पेलण्यासाठी जागतिक एकजुटीची गरज असल्याचे मत अनेक शास्त्रज्ञांनी मांडले.आंतरराष्ट्रीय वनस्पती जीवशास्त्र या परिषदेचे अध्यक्ष गोविंदजी यांनी उद्घाटन केले. जगद्विख्यात शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या परिषदेत शास्त्रज्ञांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.कोकणातील हापूस आंब्यावरील बदलत्या हवामानामुळे होणारे परिणाम व भविष्यातील आव्हाने या विषयाचा परिषदेत सहभाग होता. (प्रतिनिधी)

जगातील २० राष्ट्रांच्या शास्त्रज्ञांचा सहभाग.
परिषदेत ७०० शास्त्रज्ञ प्रतिनिधी, विद्यार्थ्यांचा सहभाग.
वनस्पतीच्या शरिरावर हवामानाच्या बदलामुळे येणाऱ्या अडथळ्याचा सक्षमपणे सामना करण्यासाठी जागतिक एकजुटीची गरज; शास्त्रज्ञांचे मत.

Web Title: Effective for changing weather conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.