सांगली : कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या सांगली वकील संघटनेच्या पदाधिकारी निवडणुकीची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. या अध्यक्षांसह इतर पदांसाठी १२ एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. यात १७ जागांसाठी १३ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. महिलांसाठीच्या सहा जागा रिक्त आहेत. दरम्यान, बिनविरोध निवडीसाठीही प्रयत्न सुरू आहेत.
निवडणुकीत अध्यक्षपदासाठी संदीप लवटे व कुबेर शेडबाळे यांच्यात तर उपाध्यक्षपदासाठी धनपाल यळमंते व नरेंद्र लांडे यांच्यात लढत होत आहे. याशिवाय सेक्रेटरी पदासाठी राजाराम यमगर व समीर शेख यांच्यात सरळ लढत होत आहे. महिला जागांसाठी एकही अर्ज आलेला नाही.
सदस्य पदासाठी शिवाजी कांबळे, राजेंद्र चव्हाण, संतोषकुमार सुहासे, चिराग सोनेचा, सुभाष संकपाळ, विक्रांत वडेर, दत्ता वठारे असे सात जागांसाठी सात अर्ज आल्याने कार्यकारिणी सदस्य बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
पदाधिकारी निवड बिनविरोध व्हावी यासाठी प्रताप हारुगडे, शैलेंद्र हिंगमिरे, भाऊसाहेब पवार, अरविंद देशमुख, एच. के. पाटील, प्रमोद भोकरे, सचिन पाटील, अरुण जाधव, फारुख मुजावर आदी ज्येष्ठ वकील प्रयत्नशील आहेत. अर्ज माघारीची ५ एप्रिलपर्यंत मुदत असणार आहे.
चाैकट
निवडणूक समिती गठित
संघटनेची निवडणूक पार पाडण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. त्यात अध्यक्ष म्हणून एस. व्ही. खाडे, उपाध्यक्ष हरीश प्रताप, सेक्रेटरी यू. व्ही. लोखंडे, सहसेक्रेटरी मायादेवी पाटील, जी. आर. कुलकर्णी, सचिन एस. पाटील, एच. आर. पाटील व पी. एम. बेद्रें यांचा समावेश आहे.