खानापूर : खानापूर येथे राष्ट्रवादीच्या विविध सेलवर पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. युवक नेते प्रतीक पाटील यांच्या हस्ते पदाधिकारी पत्रे वाटप करण्यात आली.
राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, सरचिटणीस बाळासाहेब पाटील व खानापूर तालुका उपाध्यक्ष सचिन शिंदे उपस्थित होते.
निवडी अशा : खानापूर शहराध्यक्ष : मानसिंग भगत, युवक शहराध्यक्ष : प्रशांत जिरगे, शहर युवती अध्यक्ष : अनुराधा कुलकर्णी, शहर किसान सभा सेल अध्यक्ष : पोपट भगत, सोशल मिडिया सेल : विजय भगत, सेवादल : पै. रोहित त्रिंबके, ओबीसी सेल अध्यक्ष : रूपेश पवार, अपंग सेल अध्यक्ष : नेताजी मंडले,
उपाध्यक्ष : सुरेश शिंदे, शहर राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष : प्रतीक डोंगरे, शहर कामगार सेल अध्यक्ष : राहुल मंडले, शिक्षक सेल अध्यक्ष : शैलेश खंदारे.