अकरावीसाठी ऐच्छिक सीईटीमुळे अभ्यासू विद्यार्थांना न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:20 AM2021-05-29T04:20:39+5:302021-05-29T04:20:39+5:30

अकरावी प्रवेशासाठी सीईटी ही शंभर गुणांची सहा विषयांवर आधारित परीक्षा दोन तासांची होणार आहे. या सीईटी परीक्षेच्या गुणानुसारच ...

Elective CET for Eleventh Judges Scholarly Students | अकरावीसाठी ऐच्छिक सीईटीमुळे अभ्यासू विद्यार्थांना न्याय

अकरावीसाठी ऐच्छिक सीईटीमुळे अभ्यासू विद्यार्थांना न्याय

Next

अकरावी प्रवेशासाठी सीईटी ही शंभर गुणांची सहा विषयांवर आधारित परीक्षा दोन तासांची होणार आहे. या सीईटी परीक्षेच्या गुणानुसारच अकरावीला प्रथम प्रवेश मिळणार असल्याने ही सीईटी महत्त्वाची आहे. यामुळे सध्या दहावीत असणार्‍या विद्यार्थ्याना सीईटी अभ्यास करावा लागणार आहे.

दहावीचे गुण देताना नववीला मिळालेल्या गुणांचा विचार होणार आहे. नववीला मिळालेल्या १०० गुणांपैकी किती गुण मिळाले, त्याप्रमाणात दहावीत गुण मिळणार आहेत. दहावीला घेतलेली चाचणी, पूर्वपरीक्षा यावर आधारित मिळालेल्या एकूण गुणांचे रूपांतर ३० पैकी मिळालेल्या गुणात केले जाणार आहे व उरलेले २० गुण अंतर्गत मूल्यमापनानुसार मिळणार आहेत. दहावी बोर्डाकडे असलेले याचे सर्व रेकॉर्ड विद्यार्थ्यांना पाहता येईल. दहावीचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले तरी अकरावी प्रवेशासाठी ठेवलेल्या ऐच्छिक सीईटीमुळे हुशार अभ्यासू विद्यार्थ्यांना न्याय मिळणार असल्याचे फडके यांनी सांगितले.

Web Title: Elective CET for Eleventh Judges Scholarly Students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.