बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अकरा महिन्याच्या मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 06:21 PM2021-02-22T18:21:54+5:302021-02-22T18:23:07+5:30

leopard Sangli Shirala- तडवळे ( ता.शिराळा) येथे भर दुपारी बारा च्या दरम्यान ऊस तोड कामगारांच्या अकरा महिन्याच्या मुलाचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.सुफीयान शमशुद्दीन शेख (रा. आनंदगाव ,ता.माजलगाव ,जि बीड) असे दुर्दैवी मुलाचे नाव आहे.

Eleven-month-old baby dies in leopard attack | बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अकरा महिन्याच्या मुलाचा मृत्यू

बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अकरा महिन्याच्या मुलाचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्दे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अकरा महिन्याच्या मुलाचा मृत्यू वनविभागामार्फत या कुटुंबाला १५ लाख रुपयांची मदत जाहीर

शिराळा: तडवळे ( ता.शिराळा) येथे भर दुपारी बारा च्या दरम्यान ऊस तोड कामगारांच्या अकरा महिन्याच्या मुलाचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. सुफीयान शमशुद्दीन शेख (रा. आनंदगाव ,ता. माजलगाव ,जि बीड) असे दुर्दैवी मुलाचे नाव आहे.

या घटनेमुळे नागरिक, शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्यांचा बंदोबस्त कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. वनविभागामार्फत या कुटुंबाला १५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

याबाबत घटनास्थळावरून तसेच वनविभागाकडून मिळलेली माहिती अशी की, या गावाच्या सिद्धेश्वर मंदिराजवळील अंत्रीच्या शिवारातील कृष्णात शामराव पाटील यांच्या शेतातील उसाला तोड आली होती. यासाठी शमशुद्दीन शेख यासह पाच कुटुंबातील महिला पुरुष ऊस तोड करत होते.

या ठिकाणी सुफीयान यासह दोन इतर मुलांना बसविले. सुफीयान याला ऊसाच्या बारक्या कांड्या करून खाण्यास दिल्या. इतर दोन मुले थोडी मोठी असल्याने ते इतरत्र खेळत होती. दुपारी बाराच्या दरम्यान शेजारी ऊसाच्या शेतात लपलेल्या बिबट्याने संधी साधून सुफीयान याच्या नरड्याला पकडून उसात धूम ठोकली ही घटना सुफीयानच्या वडिलांनी पहिली व त्यांनी आरडाओरडा केला.

यावेळी सर्वच ऊस तोड कामगारांनी बिबट्याचा पाठलाग केला. यामुळे तीनशे फुटावर बिबट्या बालकाला टाकून पळून गेला. या जखमी बालकाला ऊसतोड कामगारांनी तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणले मात्र त्याचा मृत्यू झाला होता.याबाबत पोलीस पाटील वैशाली पाटील यांनी पोलीस ठाण्यात वर्दी दिली.

या घटनेची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालय येथे नागरिकांनी गर्दी केली. आमदार मानसिंगराव नाईक , तहसीलदार गणेश शिंदे , उपवनसंरक्षक पी बी ढाणके , वनसंरक्षक चंद्रकांत देशमुख , देवकी ताहसिलदार , प्रकाश पाटील , बाबा गायकवाड , संपत देसाई यांनी घटनास्थळी भेट दिली.

Web Title: Eleven-month-old baby dies in leopard attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.