‘गोकुळ’च्या संग्रामात पेठनाक्यावरील महाडिक बंधूंची ‘एन्ट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:25 AM2021-04-15T04:25:03+5:302021-04-15T13:43:43+5:30
GokulMilk Election Kolhapur: कोल्हापूरच्या गोकुळ दूूध संघाच्या निवडणुुकीकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी राजर्षि शाहू आघाडीच्या प्रचारात पेठनाक्यावरील राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक हे बंधू सहभागी झाले असून त्यांच्याकडे चार तालुक्यांची जबाबदारी दिली आहे.
इस्लामपूर : कोल्हापूरच्यागोकुळ दूूध संघाच्या निवडणुुकीकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी राजर्षि शाहू आघाडीच्या प्रचारात पेठनाक्यावरील राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक हे बंधू सहभागी झाले असून त्यांच्याकडे चार तालुक्यांची जबाबदारी दिली आहे.
एकवीस जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत राहुल महाडिक यांच्याकडे शाहुवाडी, पन्हाळा या दोन तालुक्यांची जबाबदारी दिली असून, त्यांनी सभासदांच्या भेटीगाठीवर जोर दिला आहे. त्यांचे लहान बंधू सम्राट महाडिक यांच्यावर चंदगड, आजरा तालुक्यांची जबाबदारी दिली असून, त्यांनी ३५ गावांचा दौरा करून सभासदांशी संपर्क साधला आहे.
या दोघांसोबत महाडिक युवा शक्तीचे तालुकाध्यक्ष मायाप्पा पाटील, माजी सभापती शांताराम पाटील, कल्लाप्पा पाटील, मोहन पाटील, मनोहर पाटील, मनोज ओऊळकर, आर. के. पाटील, एल. आर. गावडे, अजित व्हन्याळकर प्रचारात सहभागी झाले आहेत. गोकुळच्या निवडणुकीत यंदा प्रचंड चुरस निर्माण झाली असून, पेठनाक्यावरील महाडिक बंधू पहिल्यांदाच या मैदानात प्रचारासाठी उतरले आहेत.