आरोग्याविषयी प्रत्येकाने दक्ष असणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:19 AM2021-06-24T04:19:47+5:302021-06-24T04:19:47+5:30
फोटो ओळी : चिखली (ता. शिराळा) येथे विश्वासराव नाईक कारखान्यातील आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन विराज नाईक यांच्याहस्ते करण्यात ...
फोटो ओळी : चिखली (ता. शिराळा) येथे विश्वासराव नाईक कारखान्यातील आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन विराज नाईक यांच्याहस्ते करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा
: आरोग्याविषयी प्रत्येकाने दक्ष असणे व आगाऊ काळजी म्हणून वर्षातून एकवेळ सर्व तपासण्या करून घेणे काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी केले.
चिखली (ता. शिराळा) येथे विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या २६ जून रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यकारी संचालक राम पाटील, कामगार संचालक दत्तात्रय पाटील प्रमुख उपस्थित होते.
विराज नाईक म्हणाले, शेतीमध्ये कीटकनाशके व रासायनिक खतांचा वारेमाप वापर होत आल्याने बाजारात मिळणारा भाजीपाला, अन्नधान्य, तेल यात कमालीचे बदल झाले आहेत. म्हणून सेंद्रिय शेतीला महत्त्व प्राप्त होत आहे. म्हणून किमान वर्षातून एक वेळ आरोग्याची संपूर्ण तपासणी गरजेची आहे.
यावेळी सचिन पाटील, विजयराव देशमुख उपस्थित होते. डॉ. कपिल घोरपडे, सागर पाटील, डॉ. अमन पाटील, डॉ. अर्चना बोरकर, डॉ. पार्थ देसाई, डॉ. निलम जाधव, डॉ. स्वप्नील चव्हाण यांनी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली. विक्रमसिंंह गावडे यांनी आभार मानले.