सांगली : जिल्'ातील सात हजारांवर शेतकरी कर्जमाफीच्या नव्या योजनेस अपात्र ठरले आहेत. केवळ जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील ४ हजार ८१५ शेतकऱ्यांकडे दोन लाखांवरील थकबाकी ५१.५३ कोटी रुपये आहे. त्यातही केवळ अल्पमुदतीचे पीक कर्जच माफ होणार असल्याने जिल्'ातील ५२ हजार ७१४ शेतकरी पात्र ठरले असून, त्यांचे ५८३ कोटी ५३ लाखांचे कर्ज माफ होणार आहे. दोन लाखांपर्यंतच्या मध्यम व दीर्घ मुदतीच्या शेतकऱ्यांचा विचार केल्यास अपात्र ठरणाºया शेतकºयांची संख्या ६ हजार ८०० च्या घरात जात आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोन लाख रुपयांच्या पीक कर्ज माफीची घोषणा केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांनी दोन लाखांवरील थकबाकीदार कर्जदार शेतकºयांनाही माफी देण्याचे संकेत दिले होते. तरीही शासनाच्या २७ डिसेंबर रोजीच्या परिपत्रकात केवळ २ लाखापर्यंत थकबाकीदार असलेल्या कर्जदारांनाच माफी मिळेल, असे म्हटले आहे. त्यामुळे शेतकºयांत नाराजी निर्माण झाली आहे.
शासनाने जाहीर केलेल्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेतंर्गत जिल्'ातील ५२ हजार ७१४ शेतकरी दोन लाखापर्यंतच्या पीक कर्जमाफीला पात्र ठरत आहेत. त्यांची थकबाकी ५८३ कोटी ३५ लाख आहे. शासनाच्या कर्जमाफीच्या आदेशात अल्प पीक कर्ज व अल्प पीक कर्जाचे पुनर्गठण असा उल्लेख आहे. त्यामुळे मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जदारांना याचा लाभ मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. मध्यम मुदतीचे १ हजार २०४ शेतकºयांचे १३ कोटी १ लाख, तर दीर्घ मुदतीच्या ८१३ शेतकºयांचे ७ कोटी ८१ लाख कर्ज थकीत आहे. दोन लाखावरील कर्जमाफी निर्णय न झाल्यामुळे ४ हजार ८१५ तसेच मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जदारांची संख्या एकत्र केल्यास ती ६ हजार ८०० च्या घरात जाते. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहणार आहेत.
थकबाकी हजार कोटींवरजिल्हा बॅँकेच्या शेती कर्जाची ९५ हजार ५२१ शेतकºयांकडे एकूण थकबाकी एक हजार कोटी ३० लाख ६६ हजार आहे. यात अल्प मुदतीचे कर्ज ५५ हजार ५१२ शेतकºयांकडे ६१४.०५ कोटी, मध्यम मुदतीचे कर्ज २३ हजार ८८० शेतकºयांकडे २६०. ३८ कोटी, दीर्घ मुदत कर्ज १६ हजार १२८ शेतकºयांकडे १५६.२३ कोटी आहेत.८४ हजार शेतकºयांनी फेडलेजिल्हा बॅँकेच्या शेती कर्जाची थकबाकी मोठी आहे. ९५ हजारांवर थकबाकीदार शेतकरी असून, त्यांच्याकडे १ हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज थकीत आहे. मात्र जिल्हा बॅँकेची पीक कर्जे नियमितपणे फेडणारे शेतकरीही ८४ हजाराच्या घरात आहेत. या शेतकºयांनी १९९५ कोटींची कर्जे वेळेत फेडली आहेत. त्यामुळे ते प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र असून, त्यांना शासन किती मदत करणार? याकडे शेतकºयांचे लक्ष आहे.
- दोन लाखांवरील थकबाकीदार व थकबाकी
- अल्पमुदत - २७९८ शेतकरी - ३०.७० कोटी
- मध्यम मुदत - १२०४ शेतकरी - १३.०१ कोटी
- दीर्घ मुदत - ८१३ शेतकरी - ७.८१ कोटी
- एकूण - ४८१५ शेतकरी - ५१.५३ कोटी