पलूस येथे उमाजी नाईक ब्रिगेडतर्फे शेतकऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:18 AM2021-07-04T04:18:16+5:302021-07-04T04:18:16+5:30
पलूस येथे उमाजी नाईक ब्रिगेडतर्फे कृषी दिन साजरा झाला. यावेळी शेतकऱ्यांनी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली. लोकमत न्यूज ...
पलूस येथे उमाजी नाईक ब्रिगेडतर्फे कृषी दिन साजरा झाला. यावेळी शेतकऱ्यांनी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पलूस : कृषी दिनानिमित्त उमाजी नाईक ब्रिगेडतर्फे बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली.
उपक्रमशील शेतकरी कृष्णा पवार, अमोल पाटील, झेंडू मंडले व हनुमंत जाधव या शेतकऱ्यांचा सत्कार ब्रिगेडचे राज्याध्यक्ष दगडू जाधव व डॉ. संतोष देसाई यांच्याहस्ते झाला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे फलक झळकावत कृषी कायदे रद्दची मागणी केली. ब्रिगेडचे राज्य निमंत्रक मारुती शिरतोडे म्हणाले, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची त्वरित अंमलबजावणी करावी आणि अन्यायी कृषी कायदे रद्द करावेत, या मागण्यांसह हजारो शेतकरी गेल्या आठ महिन्यांपासून दिल्लीत आंदोलन करत आहेत. याची दखल घेऊन केंद्राने कायदे रद्द करावेत. कृष्णा पवार म्हणाले, शेतीमालाला हमीभावासाठी संघटितपणे लढा उभारला पाहिजे. डॉ. संतोष देसाई, आदित्य माळी, अमोल पाटील, हणमंत जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक हिम्मतराव मलमे यांनी केले. आभार महेश मदने यांनी मानले. यावेळी आशिष जाधव, निखिल जाधव, अरुण जाधव, विशाल शिरतोडे, विक्रम शिरतोडे, आविष्कार मदने, पंकज गवळी, इम्रान इनामदार, विराज चव्हाण, शिवराज चव्हाण, सौरभ बुचडे, कुणाल येलमारे आदी उपस्थित होते.