तासगावात अधिकाऱ्यावर कारवाईसाठी उपोषण- ट्रॅक्टर घोटाळा : शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्षांचे आंदोलन;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 11:40 PM2018-09-10T23:40:55+5:302018-09-10T23:48:35+5:30
अनुदानाचे आमिष दाखवून शेतकऱ्यांना लाखो रुपयांना गंडा घालणारा पंचायत समितीतील अधिकारी चेतन नांदणीकर याच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी पंचायत समितीसमोर उपोषण केले.
तासगाव : अनुदानाचे आमिष दाखवून शेतकऱ्यांना लाखो रुपयांना गंडा घालणारा पंचायत समितीतील अधिकारी चेतन नांदणीकर याच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी पंचायत समितीसमोर उपोषण केले. गटविकास अधिकाºयांनी कारवाईबाबतचा अहवाल जिल्हाधिकाºयांकडे सादर केल्यानंतर उपोषण सोडण्यात आले.
अनुदानावर टॅक्टर मिळवून देतो, असे सांगून सांगलीतील अभिनव क्रांती या संस्थेने तालुक्यातील काही शेतकºयांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे. पंचायत समितीतील रोजगार हमी विभागाकडे कार्यरत चेतन नांदणीकर या अधिकाºयानेही अशाच पध्दतीने शेतकºयांना आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घातला. ट्रॅक्टर मिळत नाहीत म्हटल्यावर, धनादेश दिले. मात्र धनादेशही वठले नाहीत. त्यामुळे मणेराजुरीतील शेतकºयाने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
शेतकऱ्यांची फसवणूक होऊनदेखील संबंधित अधिकाºयावर कारवाई होत नसल्याने शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी पंचायत समितीसमोर कारवाईच्या मागणीसाठी उपोषण केले. या आंदोलनास भाजप आणि राष्टÑवादीच्या पंचायत समिती सदस्यांनीदेखील पाठिंबा दिला. शिवसेनेचे तालुकाप्रमुख अमोल काळे यांनीही या आंदोलनास पाठिंबा दिला. गटविकास अधिकारी अरुण जाधव यांनी संबंधित अधिकाºयावर कारवाईबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर केला असून लवकरच कारवाई होईल, असे आश्वासन दिल्यानंतर पवार यांनी उपोषण मागे घेतले.
पैसे देतानाचा पुरावा
ट्रॅक्टरचे आमिष दाखवून शेतकऱ्यांना लुबाडणारा अधिकारी चेतन नांदणीकरने गटविकास अधिकाऱ्यांच्या नोटिसीला ‘संबंधित प्रकरणाशी माझा काही संबंध नाही’, असा खुलासा सादर केला आहे. मात्र पंचायत समितीच्या उपसभापतींच्या अॅन्टी चेंबरलाच मणेराजुरीतील तीन शेतकºयांकडून पैसे घेतल्याचा पुरावा शेतकºयांकडे असल्याचे निष्पन्न झाले आहे.
कारवाई नाहीच
वर्षभरापासून ट्रॅक्ट्रर घोटाळा चर्चेत असून, पंचायत समितीची बदनामी होऊनदेखील राष्टÑवादी आणि भाजपच्या सदस्यांनी चकार शब्द काढला नव्हता. मात्र सोमवारी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष पवार यांनी उपोषण करताच, सदस्यांना कारवाई करण्याबाबत आठवण झाली.