कोरोनाची भीती दाखवून व्यापाऱ्यांनी द्राक्षांचे दर पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:42 AM2021-02-23T04:42:45+5:302021-02-23T04:42:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कवठेएकंद : द्राक्षांचे उत्पादन कमी असल्याने स्थानिक बाजारपेठेत मागणी वाढत असली तरी शेतकऱ्याला अपेक्षित दर मिळत ...

Fearing the corona, the merchants dropped the price of grapes | कोरोनाची भीती दाखवून व्यापाऱ्यांनी द्राक्षांचे दर पाडले

कोरोनाची भीती दाखवून व्यापाऱ्यांनी द्राक्षांचे दर पाडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कवठेएकंद : द्राक्षांचे उत्पादन कमी असल्याने स्थानिक बाजारपेठेत मागणी वाढत असली तरी शेतकऱ्याला अपेक्षित दर मिळत नसल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे लॉकडाऊनची भीती दाखवून व्यापारी दर पाडत आहेत.

तासगाव तालुक्यातील कवठेएकंद, नागाव, वासुंबे, मतकुणकी, डोंगरसोनी, येळावी भागातील द्राक्षशेतीला गारपिटीचा तडाखा बसला होता. यामुळे उत्पादन ५० टक्‍क्‍यांहून अधिक घटले आहे. मात्र आता कोरोनाची भीती दाखवून व्यापारी द्राक्षांचे दर पाडून खरेदी करू लागले आहेत. सुपर सोनाका जातीला चार किलोला १५० ते १८० रुपये, तर कृष्णा काळी द्राक्षे चार किलोला २७५ ते ३०० असा दर आहे. सध्या मालाला उठाव नाही, असे सांगून व्यापारी खरेदी टाळत आहेत. महिनाभरात द्राक्षांचे दर निम्म्यावर आले आहेत. नवख्या शेतकऱ्याला द्राक्ष माल घालवण्यासाठी तडजोडी कराव्या लागत आहेत.

तासगाव तालुक्‍यात कर्नाटक, दिल्ली, बांगलादेश, आंध्र प्रदेश येथील व्यापारी येतात. महिन्यापूर्वी सुपर सोनाकाचा चार किलोचा दर ३०० ते ३५० रुपये होता. मोजक्याच बागांची काढणी सुरू होती. निर्यातक्षम द्राक्षांना गेल्या आठवड्यात चार किलोला २२५ रुपये दर मिळाला होता. मात्र निर्यातीवरील अनुदान बंद केल्याने स्थानिक दर घसरले आहेत. निर्यातीचा दर ३५० ते ४०० रुपये असला तरच स्थानिक बाजारपेठेत २५० रुपयांपासून पुढे दर मिळणे शक्य होते. पण, शासनाने निर्यातीवरील अनुदान बंद केल्याने व्यापारी, दलालांनी दर देण्यासाठी हात आखडते घेतले आहेत.

कोट

गारपीट झाल्यामुळे केवळ २० टक्केच माल आहे. तरीही, व्यापारी कमी दराने द्राक्षांची खरेदी करून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत आहेत.

- सर्जेराव पाटील, द्राक्ष बागायतदार, कवठेएकंद, ता. तासगाव

कोट

खते, औषधे व व्यवस्थापन खर्चात दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. मात्र, माल कमी असतानाही अपेक्षित दर मिळत नाही.

- सुधीर मिरजकर, द्राक्ष बागायतदार, मिरजकर मळा, तासगाव

Web Title: Fearing the corona, the merchants dropped the price of grapes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.