शहरं
Join us  
Trending Stories
1
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
2
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
3
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
4
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
5
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
6
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
7
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
8
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
9
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
10
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
11
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
12
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
13
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
14
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
15
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
16
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
17
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
18
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
19
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
20
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 

कोरोनाची भीती दाखवून व्यापाऱ्यांनी द्राक्षांचे दर पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 4:42 AM

लोकमत न्यूज नेटवर्क कवठेएकंद : द्राक्षांचे उत्पादन कमी असल्याने स्थानिक बाजारपेठेत मागणी वाढत असली तरी शेतकऱ्याला अपेक्षित दर मिळत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कवठेएकंद : द्राक्षांचे उत्पादन कमी असल्याने स्थानिक बाजारपेठेत मागणी वाढत असली तरी शेतकऱ्याला अपेक्षित दर मिळत नसल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे लॉकडाऊनची भीती दाखवून व्यापारी दर पाडत आहेत.

तासगाव तालुक्यातील कवठेएकंद, नागाव, वासुंबे, मतकुणकी, डोंगरसोनी, येळावी भागातील द्राक्षशेतीला गारपिटीचा तडाखा बसला होता. यामुळे उत्पादन ५० टक्‍क्‍यांहून अधिक घटले आहे. मात्र आता कोरोनाची भीती दाखवून व्यापारी द्राक्षांचे दर पाडून खरेदी करू लागले आहेत. सुपर सोनाका जातीला चार किलोला १५० ते १८० रुपये, तर कृष्णा काळी द्राक्षे चार किलोला २७५ ते ३०० असा दर आहे. सध्या मालाला उठाव नाही, असे सांगून व्यापारी खरेदी टाळत आहेत. महिनाभरात द्राक्षांचे दर निम्म्यावर आले आहेत. नवख्या शेतकऱ्याला द्राक्ष माल घालवण्यासाठी तडजोडी कराव्या लागत आहेत.

तासगाव तालुक्‍यात कर्नाटक, दिल्ली, बांगलादेश, आंध्र प्रदेश येथील व्यापारी येतात. महिन्यापूर्वी सुपर सोनाकाचा चार किलोचा दर ३०० ते ३५० रुपये होता. मोजक्याच बागांची काढणी सुरू होती. निर्यातक्षम द्राक्षांना गेल्या आठवड्यात चार किलोला २२५ रुपये दर मिळाला होता. मात्र निर्यातीवरील अनुदान बंद केल्याने स्थानिक दर घसरले आहेत. निर्यातीचा दर ३५० ते ४०० रुपये असला तरच स्थानिक बाजारपेठेत २५० रुपयांपासून पुढे दर मिळणे शक्य होते. पण, शासनाने निर्यातीवरील अनुदान बंद केल्याने व्यापारी, दलालांनी दर देण्यासाठी हात आखडते घेतले आहेत.

कोट

गारपीट झाल्यामुळे केवळ २० टक्केच माल आहे. तरीही, व्यापारी कमी दराने द्राक्षांची खरेदी करून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत आहेत.

- सर्जेराव पाटील, द्राक्ष बागायतदार, कवठेएकंद, ता. तासगाव

कोट

खते, औषधे व व्यवस्थापन खर्चात दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. मात्र, माल कमी असतानाही अपेक्षित दर मिळत नाही.

- सुधीर मिरजकर, द्राक्ष बागायतदार, मिरजकर मळा, तासगाव