बंडाची भाषा करणाऱ्यांनी समोरासमोर येऊन लढावे

By admin | Published: September 27, 2014 12:00 AM2014-09-27T00:00:32+5:302014-09-27T00:12:10+5:30

मदन पाटील : राष्ट्रवादी, भाजपला आव्हान

The fighters of the rebellion should come face to face and fight face to face | बंडाची भाषा करणाऱ्यांनी समोरासमोर येऊन लढावे

बंडाची भाषा करणाऱ्यांनी समोरासमोर येऊन लढावे

Next

सांगली : सांगली मतदारसंघात आमच्या घराण्याला संपविण्यासाठी आतापर्यंत एकास एक उमेदवार दिले गेले. त्यामुळेच यंदा वेगवेगळे लढण्याची भूमिका पोटतिडकीने मांडली होती. आता राष्ट्रवादीचे खायचे दात बाहेर आले आहेत. ज्यांनी घोषणा केली, त्यांनी तरी किमान निवडणुकीच्या मैदानात उतरावे. आत एक आणि बाहेर दुसरेच, असे न करता सरळ समोरासमोर येऊन लढा, असे आव्हान काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री मदन पाटील यांनी राष्ट्रवादी व भाजपला आज (शुक्रवारी) दिले.
मदन पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, गेल्यावेळी काँग्रेसने मला उमेदवारी दिली. तत्पूर्वी मी अपक्ष म्हणून निवडून आलो होतो. राज्याच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली, पण मागील निवडणुकीवेळी मिरजेत काही घटना घडल्या. त्याचा भावनिक प्रचार झाला. लोकांच्या भावनेला हात घालून काही शक्तींनी माझा पराभव केला. आमदारकीच्या काळात सव्वादोनशे कोटींची कामे केली होती. शेरीनाला, झोपडपट्टीमुक्त शहर, खोकीमुक्त शहर, वारणा पाणी योजना या कामांना यश आले होते. या मुद्द्यांकडे जनतेनेही दुर्लक्ष केले. निवडणुकीनंतर माझे काय चुकले? हेच कळले नाही. मी कधी भ्रष्टाचारात सहभागी नाही. माझ्या वडिलांपासून घराण्याचे राजकारण संपविण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. आता त्यांचे खायचे दात बाहेर आले आहेत. कोण रिंगणात उतरतो आणि कोण पळ काढतो, हेच बघायचे आहे. संभाजी पवार यांनीही जनता दल, भाजप आणि आता शिवसेना असे पक्षबदल केले आहेत. त्यांना कितपत यश मिळते, हे माहीत नाही.
केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, मंगळावर यान सोडण्याची तयारी काँग्रेसने केली. यापूर्वीही काँग्रेसने अशा अनेक मोहिमा राबविल्या, पण मोदींइतके मार्केटिंग केले नव्हते. लोकसभेवेळी त्यांनी मार्केटिंग करून जनतेची दिशाभूल केली. गेल्या चार महिन्यात महागाई किती कमी झाली? केंद्राच्या अंदाजपत्रकातूनही जनतेच्या हाती काहीच पडलेले नाही. (वार्ताहर)

...तर त्यांचीही प्रकरणे बाहेर काढू
खोटेनाटे बोलून माझ्यावर टीका करू नका. काढायचीच झाली, तर आम्हीही त्यांची प्रकरणे बाहेर काढू. निवडणुका खेळीमेळीत झाल्या पाहिजेत. कोणाला निवडून द्यायचे, हे जनता ठरवत असते, असा टोलाही पाटील यांनी लगावला. मुन्ना कुरणे काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत. त्यांनाही अर्ज भरण्याचा अधिकार आहे. अजून अर्ज मागे घेण्यास वेळ आहे, असे म्हणत अधिक भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.

Web Title: The fighters of the rebellion should come face to face and fight face to face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.