आगीने दोन जातीवंत बैलांसह जनावरांच्या मृत्यूने शेतमजुराचा संसार उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:27 AM2021-04-07T04:27:59+5:302021-04-07T04:27:59+5:30
माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, रणजितसिंह नाईक, सुखदेव पाटील, उत्तम डांगे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी जळीतग्रस्त शेतकरी तात्यासाहेब भांडवले, ...
माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, रणजितसिंह नाईक, सुखदेव पाटील, उत्तम डांगे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी जळीतग्रस्त शेतकरी तात्यासाहेब भांडवले, पोपट गायकवाड, विलास यादव, माणिक कदम उपस्थित होते. दुसऱ्या छायाचित्रात उद्ध्वस्त झालेला गोठा. तिसऱ्या छायाचित्रात दोन जातीवंत बैल.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा येथील औढी रस्त्यावरील पाडळी हद्दीत यादव मळ्यातील तात्यासाहेब भांडवले यांच्या गोठ्यास सोमवार दि. ५ रोजी रात्री आग लागली. आगीत दोन जातीवंत बैल, दोन म्हशी, एक वासरू, एक रेडकू अशी सहा जनावरे, पाच शेळ्या, ६० ते ६५ कोंबड्या, मृत्युमुखी पडले. एवढेच नव्हे तर जनावरांची शेड, शेती औजारे, सेंट्रींगचे साहित्य, संसाराची भांडी सर्व काही जळून जाऊन नऊ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. रात्री ८ च्या दरम्यान घडली. रात्री १ च्या दरम्यान आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत सर्व काही संपले होते.
या आगीत एक गाभण म्हैस तसेच ज्या बैलांच्यावर ते जीव ओवाळून टाकत होते ते सुगर व सायब्या या शर्यतीच्या बैलांचाही जीव गेला. यावेळी शेकडो नागरिक, तलाठी शंभु कन्हेरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ए. वाय. थोरात यांनी सहकार्य केले. हे कुटुंब उद्ध्वस्त झालेले पाहून त्याच ठिकाणी नागरिकांनी आर्थिक मदत गोळा करण्यास सुरुवात केली. मात्र, तात्यासाहेब यांच्या डोळ्यादेखत त्यांची आवडती बैल जोडी आणि जनावरे आगीमध्ये मृत्युमुखी पडली.
माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, रणजितसिंह नाईक, सुखदेव पाटील, उत्तम डांगे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी जळीतग्रस्त शेतकरी तात्यासाहेब भांडवले, पोपट गायकवाड, विलास यादव, माणिक कदम, महेश खबाले, राजेंद्र नलवडे, सुभाष नलवडे, हरिभाऊ कवठेकर, रामचंद्र पाटील यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ व अधिकारी उपस्थित होते.
चौकट-
पाच लाखांची जाेडी
या आगीतून एक रेडकू वाचले. ते गोठ्याच्या दरवाज्यात होते. त्याचे दावे तात्यासाहेब यांच्या आईने कापून काढले. त्यामुळे त्याचा प्राण वाचला. त्यास किरकोळ भाजले आहे. दोनच दिवसांपूर्वी सुगर व साहिब्याला पाच लाख रुपयास विकत घेण्यास काहीजण आले होते. मात्र, तात्यासाहेब यांनी हे बैल विकले नाहीत.