जतला भाजपच्या नाराजांसोबत पाच पक्ष एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:19 AM2021-06-25T04:19:46+5:302021-06-25T04:19:46+5:30

जत तालुक्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, रासप, आरपीआय (आठवले गट), प्रहार हे पक्ष व संघटना कार्यरत असून यापैकी काँग्रेस ...

Five parties together with BJP's disgruntled Jatla | जतला भाजपच्या नाराजांसोबत पाच पक्ष एकत्र

जतला भाजपच्या नाराजांसोबत पाच पक्ष एकत्र

Next

जत तालुक्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, रासप, आरपीआय (आठवले गट), प्रहार हे पक्ष व संघटना कार्यरत असून यापैकी काँग्रेस व राष्ट्रवादीचे सवतेसुभे आहेत. त्यातच भाजपअंतर्गत मोठा संघर्ष आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षनेतृत्वावर नाराज आहेत. या नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला असून त्याची सुरुवात गुरुवारी नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते विजय ताड यांच्या फार्महाऊसवरील बैठकीने करण्यात आली.

आरपीआय आठवले गटाचे प्रदेश सरचिटणीस विवेक कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डाॅ. रवींद्र आरळी, माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ही बैठक पार पडली. या बैठकीत आगामी जत नगरपरिषदेच्या निवडणुकीत तिसरी आघाडी स्थापन करून या आघाडीची अधिकृत नोंदणी करून पक्षविरहित निवडणुका लढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

नगरसेवक विजय ताड, मनसेचे नेते कृष्णा कोळी, कृष्णा तळेकर, चंद्रकांत गुड्डोडगी, किरण शिंदे, चंद्रकांत ऊर्फ पापा कुंभार, भीमराव देवकर, डाॅ. प्रवीण वाघमोडे, वंचित बहुजन आघाडीचे नेते अमोल साबळे, प्रहार संघटनेचे सुनील बागडे यांनी भूमिका मांडली. जत नगरपरिषदेच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांची विकासकामे होत नाहीत, असे सांगत नगरपरिषदेच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली.

विवेक कांबळे, संजय कांबळे, डाॅ. आरळी यांनी मार्गदर्शन केले. बैठकीला आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण आठवले, विधानसभा क्षेत्राध्यक्ष राकेश कांबळे उपस्थित होते.

Web Title: Five parties together with BJP's disgruntled Jatla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.