माजी नगरसेवक सुभाष गोयकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:28 AM2021-05-19T04:28:05+5:302021-05-19T04:28:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क संजयनगर : महापालिकेचे माजी नगरसेवक आणि माजी सभापती सुभाष दऱ्याप्पा गोयकर (वय ५५) यांचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
संजयनगर : महापालिकेचे माजी नगरसेवक आणि माजी सभापती सुभाष दऱ्याप्पा गोयकर (वय ५५) यांचे मंगळवारी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, मुलगा, सून, दोन भाऊ असा परिवार आहे.
संजयनगर परिसरातील वॉर्ड ३ मधून २००३ ते २०१३ या कालावधीमध्ये ते जनसुराज्य शक्ती पक्षातून निवडून आले होते. तत्पूर्वी त्यांनी काॅंग्रेसमधून महापालिकेची निवडणूक लढविली होती. शिंदे मळा येथील चौकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे नामकरण करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. सांगली शहर ग्रामीण रास्त भाव दुकान संघटनेचे ते उपाध्यक्ष होते.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. उपचार सुरू असतानाच मंगळवारी सकाळी अकरा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर मिरजेतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.