जिल्ह्यात कोरोनाचे चार बळी; २१३ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:25 AM2021-03-28T04:25:54+5:302021-03-28T04:25:54+5:30

सांगली : गेल्या चार महिन्यांत प्रथमच कोरोनाने सर्वाधिक मृत्यूची नोंद शनिवारी झाली. जिल्ह्यात सांगली, खानापूर, मिरज आणि शिराळा तालुक्यातील ...

Four victims of corona in the district; 213 new patients | जिल्ह्यात कोरोनाचे चार बळी; २१३ नवे रुग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे चार बळी; २१३ नवे रुग्ण

Next

सांगली : गेल्या चार महिन्यांत प्रथमच कोरोनाने सर्वाधिक मृत्यूची नोंद शनिवारी झाली. जिल्ह्यात सांगली, खानापूर, मिरज आणि शिराळा तालुक्यातील चारजणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या पुन्हा वाढताना २१३ जणांना बाधा झाली आहे, तर ९२ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

कोरोनाची दहशत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. चार महिन्यांत प्रथमच जिल्ह्यात शनिवारी एकाचदिवशी चारजणांचे बळी गेल्याने चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. महापालिका क्षेत्रात ६१, तर वाळवा, खानापूर, आटपाडी, मिरज आणि शिराळा तालुक्यातील रुग्णसंख्या वाढतच चालली आहे.

शनिवारी आरोग्य विभागाच्यावतीने आरटीपीसीआरअंतर्गत ११०१ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात १३१ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे, तर रॅपिड ॲन्टिजेनच्याही ११०१ जणांच्या चाचणीमधून ८५ जण बाधित आढळले आहेत.

जिल्ह्यातील पाच रुग्णालये व कोविड सेंटर व होम आयसोलेशनमध्ये सध्या १६१६ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील १२० जणांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. त्यातील १०९ जण ऑक्सिजनवर, तर ११ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

सातारा जिल्ह्यातील दोन, तर रत्नागिरी जिल्ह्यातील एकास कोरोनाचे निदान झाले आहे.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ५०७५३

उपचार घेत असलेले १६१६

कोरोनामुक्त झालेेले ४७३५२

आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७८५

शनिवारी दिवसभरात

सांगली ३७

मिरज २४

खानापूर २२

मिरज तालुका २१

पलूस, वाळवा प्रत्येकी २०

आटपाडी, कडेगाव प्रत्येकी १७

शिराळा १५

कवठेमहांकाळ ९

जत ७

तासगाव ४

Web Title: Four victims of corona in the district; 213 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.