बागणीत रेशनिंग दुकानासमोर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:29 AM2021-05-20T04:29:32+5:302021-05-20T04:29:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बागणी : वाळवा तालुक्यातील बागणी, काकाचीवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदाराने धान्यवाटप सुरू केले. पण, धान्य दुकानदाराने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बागणी : वाळवा तालुक्यातील बागणी, काकाचीवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदाराने धान्यवाटप सुरू केले. पण, धान्य दुकानदाराने गर्दी होऊ नये, असे कोणतेही नियोजन केले नव्हते. यामुळे दुकानासमोर नागरिकांची गर्दी झाल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसत होते.
नेहमी रेशन दुकानासमोर धान्य नंबरप्रमाणे घेताना ओळीने ठेवण्यात येणाऱ्या पिशव्या पुढे सरकवण्यासाठी प्रत्येकाची धांदल सुरू असते. परंतु, बुधवारी प्रभाग दोन व पाचचे धान्यवाटप चालू असताना दुकानासमोर प्रचंड गर्दी होती. बागणी, काकाचीवाडी परिसरातील कोरोना रुग्ण वाढत असताना स्वस्त धान्य दुकानासमोर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसत होता. स्वस्त धान्य दुकानदाराला लोकांना लांब उभे करण्याच्या सूचना नागरिकांनी दिल्या होत्या. यावर दुकानदाराने त्यांना धान्यवाटप चालू ठेवू की बंद करू, असा प्रतिप्रश्न केला. आधीच महिना संपत आला तरी लोकांना रेशनिंगचे साहित्य मिळाले नाही. यामुळे नागरिक गप्प राहून दुकानदाराचे ओरडणे सहन करीत होते.