जनुकीय तंत्रज्ञान आधुनिक संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:25 AM2021-03-06T04:25:59+5:302021-03-06T04:25:59+5:30
सावळज (ता. तासगाव) येथील श्री. रावसाहेब रामराव पाटील महाविद्यालयाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्रभारी ...
सावळज (ता. तासगाव) येथील श्री. रावसाहेब रामराव पाटील महाविद्यालयाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बी. डी. अवघडे अध्यक्षस्थानी होते.
प्रा. पाटील म्हणाले की, जीवशास्त्रातील नावीन्यपूर्ण संशोधनाचा फायदा मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये होत आहे. वेगाने कमी होणारी जमीन, पाणी व वाढत्या लोकसंख्येला लागणारी अन्न पुरवण्याची ताकद आणि वाढती विषाणूजन्य रोगराई व त्यावरील औषध निर्माण करण्याची क्षमता फक्त जनुकीय तंत्रज्ञानामध्ये आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भविष्यात जनुकीय संशोधनात करिअरच्या संधी शोधाव्यात.
प्राचार्य डॉ. बी. डी. अवघडे यांनी जनुकीय तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. विज्ञान मंडळाचे प्रमुख प्रा. एस. पी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एस. एम. वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एस. एस. झांबरे यांनी आभार मानले. यावेळी प्रा. पी. बी. चव्हाण, प्रा. ए. आर. उथळे, प्रा. व्ही. व्ही. जाधव, प्रा. ए. एस. पवार, प्रा. बेंडे, प्रा. माळी आदी उपस्थित होते.