सोन्याळात घोणस सापाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:18 AM2021-07-03T04:18:02+5:302021-07-03T04:18:02+5:30
फोटो ओळ : सोन्याळ (ता. जत) येथे शेततलावात पडलेल्या घोणस सापाला वन विभागाचे कर्मचारी, सर्पमित्रांनी जीवदान दिले. लोकमत न्यूज ...
फोटो ओळ : सोन्याळ (ता. जत) येथे शेततलावात पडलेल्या घोणस सापाला वन विभागाचे कर्मचारी, सर्पमित्रांनी जीवदान दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : सोन्याळ (ता. जत) येथे भक्ष्याच्या शोधात शेततलावात गेल्या दोन दिवसांपासून पडलेल्या अतिविषारी घोणस जातीच्या सापाला वन विभागाचे कर्मचारी व सर्पमित्रांनी जीवदान दिले. नैसर्गिक अधिवासात या घोणस सापाला सुरक्षितपणे सोडून देण्यात आले.
सोन्याळ येथे लखन होनमोरे यांचे सोन्याळ-उटगी रस्त्यालगत असणाऱ्या शेतात शेततलाव आहे. दोन दिवसांपासून घोणस जातीचा साप या तलावात पडला होता. या सापाला तलावातून बाहेर येता आले नाही.
लखन होनमोरे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. यानंतर वनरक्षक एच. जी. वगरे, राजेंद्र वाघमारे, आप्पासाहेब निळे, माडग्याळ येथील सर्पमित्र दशरथ सावंत यांनी तलावातून सापाला सुरक्षित बाहेर काढून जीवदान दिले.
यावेळी लखन होनमोरे, काडसिद्ध काराजनगी, अभिजीत कांबळे, शंकरगौडा बिरादार, मलकारी होनमोरे, पंचू काराजनगी, बाबासाहेब कांबळे, आदी उपस्थित होते.