आष्टा : जो देश शिक्षकांचा सन्मान करतो, तो देश प्रगतिपथावर असतो. मुलांबरोबर मुलींनाही उच्चशिक्षण देणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. संजय थोरात यांनी केले.
आष्टा येथील श्री चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक प्रा. आर.ए. कनाई, माधुरी पाठक, डॉ. लहू कुरणे यांच्यासह धनपाल मगदूम, दिनकर थोरात, अनिल भोळे, अप्पासाहेब आडमुठे, आबासाहेब गायकवाड, डॉ. प्रवीण पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सुरुवातीला अध्यक्ष अमीर फकीर यांनी ट्रस्टने महापुरासह कोरोना संकटात केलेल्या विविध सामाजिक कार्यांची माहिती दिली. यावेळी सर्वच गुरुजनांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रदीप पाटील, डॉ. प्रकाश आडमुठे, महेश गुरव, अभिजित कुलकर्णी, राजेश पाटील, अतुल महाजन, संतोष जोशी, राहुल थोटे, संतोष वग्यानी, दीपक थोटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रदीप पाटील यांनी स्वागत केले. ए.के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर श्रद्धा लांडे यांनी आभार मानले.
फोटो : ०५ आष्टा १
ओळ : आष्टा येथील श्री चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रा. आर.ए. कनाई, माधुरी पाठक, डॉ. लहू कुरणे यांच्यासह गुणवंत शिक्षकांचा गौरव करण्यात आला.