राष्ट्रवादीच्या ताब्यात महाराष्ट्राची सत्ता द्या

By admin | Published: October 13, 2014 09:19 PM2014-10-13T21:19:50+5:302014-10-13T23:03:14+5:30

जयंत पाटील : इस्लामपुरात प्रचाराची सांगता; सर्व समाजाला बरोबर घेऊन विकास साधला

Give Maharashtra the power of NCP | राष्ट्रवादीच्या ताब्यात महाराष्ट्राची सत्ता द्या

राष्ट्रवादीच्या ताब्यात महाराष्ट्राची सत्ता द्या

Next

इस्लामपूर : समाजातील सर्व घटकांना सामावून घेऊन विकासाचे राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या हातात हे राज्य देण्यासाठी १५ तारखेस मतदान करा, असे आवाहन माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील केले.
इस्लामपूर येथे प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते. जयंत पाटील पुढे म्हणाले, इस्लामपूर शहराने प्रत्येक निवडणुकीत मोठे मताधिक्य देऊन माझी पाठराखण केली आहे़ मी १५ वर्षे सरकारमध्ये काम करताना जे-जे देशात, राज्यात चांगले आहे ते-ते या शहरात, तालुक्यात आणण्याचे जाणीवपूर्वक काम केले़ आमच्या सरकारने मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण लागू केले़ लिंगायत व जैन समाजास अल्पसंख्यांकाचा दर्जा देऊन त्यांच्यातील काही जातींचा ओबीसीमध्ये समावेश केला़ ग्रामविकास खाते देशात अग्रभागी ठेवले आहे.
माजी मंत्री अण्णासाहेब डांगे म्हणाले, या मतदारसंघात भाजप-शिवसेनेस उमेदवार मिळाला नाही़ ्न्नराज्यातील कोणत्याही विरोधी नेत्याने येथे सभा घेतली नाही़ याचाच अर्थ त्यांनी पराभव मान्य केला आहे़ पक्षाचे डोळे उघडण्यासाठी जयंतरावांना एक लाखाच्या फरकाने निवडून द्या.
प्रा़ मच्छिंद्र सकटे म्हणाले, ज्याप्रमाणे मोदींच्या पाठीशी गुजरात राज्य आणि गुजराती माणूस उभा राहिला त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य व मराठी माणूस शरद पवार यांच्या पाठीशी उभा राहिला नाही़ या निवडणुकीत त्यांना ताकद देण्यासाठी मतदान करा.
यावेळी माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, माजी नगराध्यक्षा सौ. अरुणादेवी पाटील, पै़ भगवान पाटील, अ‍ॅड़ सुधीर पिसे, नगरसेवक खंडेराव जाधव, निशिकांत पाटील, मुकुंद कांबळे, सौ़ रोझा किणीकर, एल़ के. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, दिलीपराव पाटील, प्रा़ शामराव पाटील, उपनगराध्यक्ष संजय कोरे, चिमण डांगे, अ‍ॅड़ धैर्यशील पाटील, वाय़ एस. जाधव, उद्योगपती सुरेंद्र पाटील, विलास भिंगार्डे, मुनीर पटवेकर, पिरअली पुणेकर, विजय कोळेकर, नंदकुमार कुंभार उपस्थित होते़ शहाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले़ माजी उपनगराध्यक्ष शंकर चव्हाण यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: Give Maharashtra the power of NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.