मोबाईलच्या पेटाऱ्यातून द्या स्मार्ट ॲप्स...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:24 AM2021-05-16T04:24:18+5:302021-05-16T04:24:18+5:30
पण याच मोबाईलच्या पेटाऱ्यात मुलांना स्मार्ट बनविणारी ॲप्स भरुन देण्याचा शहाणपणा केलात तर मोबाईलसारखा दुसरा दोस्त नाही. एरवी पुस्तकांच्या ...
पण याच मोबाईलच्या पेटाऱ्यात मुलांना स्मार्ट बनविणारी ॲप्स भरुन देण्याचा शहाणपणा केलात तर मोबाईलसारखा दुसरा दोस्त नाही. एरवी पुस्तकांच्या पानांतच वाचावा लागणारा भूगोल आता स्क्रिनवर प्रत्यक्ष दृकश्राव्य स्वरुपात अनुभवता येतील. अकबर बादशाहची जन्मतारीख आणि पायथॅगोरसच्या प्रमेयासारखी क्लिष्ट उत्तरे चुटकीसरशी मिळतील.
चौकट
फसव्या वाटा आणि बेसावध पालक
- मोबाईलवर अचानकच डोकावणाऱ्या आक्षेपार्ह लिंक्स मुलांना भलत्याच वाटेवर घेऊन जातात. आई-वडिलांपेक्षा स्मार्ट मुले या लिंक्सवर वरचेवर डोकावत राहतात.
- अभ्यासादरम्यान मध्येच येणाऱ्या आक्षेपार्ह जाहिरातीदेखील डोकेदुखी ठरताहेत. फाईव्ह जीच्या दिशेने प्रवास करणारा मोबाईल मुलांनाही तितक्याच वेगाने फसव्या वाटांवर नेतो आहे.
- ऑनलाईन शॉपिंगमध्ये पालकांपेक्षा हुश्शार झालेली मुले अनेकदा पालकांचे पाकीट रिकामे करताहेत.
- अशावेळी मुलांना कोठेतरी कोपऱ्यातील खोलीत मोबाईल घेऊन बसविण्याऐवजी सर्वांसमवेत हॉलमध्ये बसविण्याचा फायदा होतो.
- ‘यू ट्यूब’च्या सेटिंगमध्ये १८ वर्षांखालील मुले मोबाईल वापरताहेत, असे नोंदविल्यास प्रौढांसाठीच्या जाहिराती लॉक होतात.
- ऑनलाईन शॉपिंगचे पीन क्रमांक मुलांना न देण्यातच शहाणपणा.
चौकट
हे वापरुन पहा...
- मुलांना लवकर उठविण्यासाठी अलार्मी ॲपचा वापर
- संवादात्मक अभ्यासासाठी सॉक्ट्रॅटिक ॲप
- मुलांच्या सवयी ट्रॅक करणारे लुप हॅबिट ट्रॅकर
- गृहपाठ सोडविण्यासाठी ब्रेन्ली होमवर्क हेल्प ॲण्ड सोव्हर
- डोळयांवरील ताण कमी करण्यासाठी ब्ल्यू लाईट फिल्टर
कोट
मोबाईल वापरणाऱ्या मुलांसंदर्भात पालकांच्या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. सोसतही नाही आणि सांगताही येत नाही अशी विचित्र अवस्था पालकांची झाली आहे. मोबाईल वापरणाऱ्या मुलांमागे २४ तास छडी घेऊन उभे राहणेदेखील शक्य नाही. अशा गंभीर समस्येवर तारतम्याने आणि हुशारीने मार्ग काढणे हेच समंजस पालकत्व ठरते.
- अर्चना मुळे, समुपदेशक.