ग्रासरुट इनोव्हेटर : संशोधक शेतकऱ्याने बनवली अवघड काम करणारी तानकप्पी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:09 PM2018-11-17T12:09:26+5:302018-11-17T12:10:29+5:30

मिरज तालुक्यातील एरंडोलीतील शेतकरी बाळासाहेब दत्तात्रय बाबर गेली २५ वर्षे संशोधनाचे कार्य करीत आहेत.

Grassroot Innovator: A researcher farmer made Tankappi for difficult task | ग्रासरुट इनोव्हेटर : संशोधक शेतकऱ्याने बनवली अवघड काम करणारी तानकप्पी

ग्रासरुट इनोव्हेटर : संशोधक शेतकऱ्याने बनवली अवघड काम करणारी तानकप्पी

Next

- अशोक डोंबाळे (सांगली)

मिरज तालुक्यातील एरंडोलीतील शेतकरी बाळासाहेब दत्तात्रय बाबर गेली २५ वर्षे संशोधनाचे कार्य करीत आहेत. या कालखंडामध्ये त्यांनी शेतीउपयोगी अनेक वस्तूंचा शोध लावला आहे. कूपनलिकेतील मोटर वर काढणारी तानकप्पी, बॅटरीवर चालणारे मल्चिंग कटर हे त्यांचे संशोधन शेतकऱ्यांना चांगलेच उपयुक्त ठरत आहे.

बाबर हे मोटार रिवायंडिंगचे  काम करतात. हे काम करताना मोटार काढण्यासाठी दोरी खेचून मोटार वर काढावी लागत होती. त्यामुळे त्यासाठी मोटार काढण्यास आठ ते दहा लोक लागत. खोलीवर असलेली मोटार कूपनलिकेतून काढताना शेतकऱ्यांना कधी पाठीचे मणके, गुडघेदुखी, हात दुखणे असे प्रकार होतात. दोरीने सोडलेली मोटार काढण्यासाठी कोणतेही यंत्र नसल्याने मग बाबर यांनी त्यावर संशोधन व वेगवेगळे प्रयोग केले. ‘तराफा’ हा प्रकार वापरून तानकप्पी यंत्र तयार केले. हे यंत्र सायकल, मोटारसायकल किंवा दोन व्यक्ती कुठेही नेऊ, आणू शकतात. वापरण्यास अतिशय उपयुक्त, सुलभ असलेले हे यंत्र टाकाऊ पाईप, अँगल, चॅनल, लोखंडी जाड पत्रा, सेंट्रिंग सळई, बेअरिंग अशा वस्तूंपासून बनविले आहे.

हे यंत्र तयार करण्यासाठी केवळ साडेचार हजार रुपये खर्च आला. कूपनलिकेतील मोटार काढण्यासह घराच्या वरच्या मजल्यावर खडी, वाळू, वीट उचलण्यासाठी उपयोगात आणता येईल. मोटार वर काढण्यासाठी बाबर यांनी तयार केलेली तानकप्पी वापरून शेतकरी शारीरिक श्रम वाचवीत आहेत. शेतकऱ्याचे श्रम कमी करण्यासाठी बाबर यांनी मल्चिंग कटर तयार केले आहे. बाबर यांच्या एका शेतात मल्चिंग पेपर पसरून नवीन तंत्राने ढबू मिरची, लांब मिरची, गवार, भेंडी, टोमॅटो आणि इतर पिके घेण्यात येतात. 

Web Title: Grassroot Innovator: A researcher farmer made Tankappi for difficult task

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.