पलूस : सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षामध्ये पलूस सहकारी बँकेस तरतूद पूर्व १३ कोटी ढोबळ नफा झाला आहे. बँकेच्या संचालक मंडळाने वसंतरावजी पुदाले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बँकेचा कारभार पारदर्शकपणे केले आहे. सर्व ग्राहकांच्या सहकार्याने बँकेचा एकूण व्यवसाय ६८५ कोटींपेक्षा अधिक झाला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष वैभव पुदाले यांनी केले. ते म्हणाले, आर्थिक वर्षात संपूर्ण वर्षभर कोरोना महामारीचे संकट असतानाही बँकेने व्यवसायात अतिशय चांगली प्रगती केली आहे. बँकेचे निव्वळ एनपीए प्रमाण शून्य टक्के आहे. बँकेच्या एकूण ठेवी ४०३ कोटी व एकूण कर्जे २८३ कोटी इतकी आहेत. गतवर्षीच्या व्यवसायात ३० कोटींची वाढ झालेली आहे, तसेच बँकेने टप्प्याटप्प्याने स्वमालकीच्या शाखा इमारती बांधण्याचे नियोजन केले आहे.
बँकेचे उपाध्यक्ष शामराव डाके म्हणाले किलोस्करवाडी शाखेच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण केले असून, सांगलीतील महावीरनगर शाखा इमारत बांधकाम लवकरच सुरू करणार आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल घारे, विष्णू मिसाळ, मार्तंड सदामते, प्रकाश पाटील, रंगराव नलवडे, महिपती जाधव, गणपती सूर्यवंशी, बजरंग सूर्यवंशी, कृष्णा इदाटे, शिवप्रसाद शिंदे, लालासाहेब संकपाळ, रमेश राजमाने, ज्योती शितापे, लक्ष्मी कदम, अधिकारी सुहास सूर्यवंशी, नारायण सगरे, प्रकाश डाके उपस्थित होते.