सांगली : शहरातील कारखाना परिसरातील एका व्यावसायिकावर जीएसटी विभागाकडून छापा टाकण्यात आल्याची चर्चा परिसरात होती. याबाबत सांगलीतील जीएसटी कार्यालयाशी संपर्क साधला असता, त्यांनी कारवाई केली नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, कोल्हापूर येथील जीएसटी विभागाने छापा टाकल्याचे समजते. पण त्याबाबत रात्री उशिरापर्यंत ठोस माहिती मिळू शकली नाही.
कारखाना परिसरात एका बड्या व्यावसायिकावर जीएसटी विभागाकडून छापा टाकण्यात आला. हा व्यावसायिक भंगार विक्रेता असल्याची चर्चा आहे. पण जीएसटी विभागाने या व्यावसायिकावर कशासाठी कारवाई केली, याचा उलगडा होऊ शकलेला नाही. सांगली विभागाशी संपर्क साधला असता, त्यांनी छापा टाकला नसल्याचे सांगितले. दुसरीकडे कोल्हापूर विभागाने छापा टाकल्याची चर्चा परिसरात होती. या छाप्याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू होती.