येथील एका भंगार व्यापाऱ्याच्या फर्मवर शुक्रवारी सकाळी जीएसटीचे कोल्हापूर येथील पथक दाखल झाले. त्यांनी सकाळपासूनच व्यापार्याकडील कागदपत्रांची तपासणी सुरू केली होती. संबंधित व्यापार्याने बोगस बिलांद्वारे जीएसटीचा भरणा केला नसल्याचा संशय पथकाला होता. त्या अनुषंगाने पथकाने दिवसभर कागदपत्रांची तपासणी केली. त्यातील काही कागदपत्रे पथकाने जप्त केल्याचेही सांगण्यात आले.
मात्र संबंधित व्यापार्यावर नेमका कोणत्या कारणासाठी छापा टाकण्यात आला, याची माहिती देण्यास पथकातील अधिकार्यांनी नकार दिला. त्यामुळे छाप्यातील कारवाईबाबतचा तपशील रात्री उशिरापर्यंत मिळू शकला नाही. या छाप्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती.