गुडेवार साहेब... झेडपी बरखास्त करून भ्रष्टाचार संपेल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:21 AM2020-12-26T04:21:28+5:302020-12-26T04:21:28+5:30
चौकट आम्ही मतदारसंघात फिरताना ते प्रश्न आणि नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊनच आम्ही शिफारशी करतो; कुठे भ्रष्टाचार करणे हा हेतू ...
चौकट
आम्ही मतदारसंघात फिरताना ते प्रश्न आणि नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊनच आम्ही शिफारशी करतो; कुठे भ्रष्टाचार करणे हा हेतू मुळीच नसतो. सभेत मीच ठराव मांडला, तो असा आहे की, आम्ही शिफारशी करू, तुम्ही मान्य करा, नाही तर फाडून टाका. असा ठराव करणे गुन्हा आहे का? भ्रष्टाचार संपला पाहिजे, त्यासाठी आम्ही शंभर टक्के सहकार्य केले. पण, अधिकाऱ्यांनी सभागृहाचा आदर ठेवण्याची गरज आहे.
- संजीव पाटील, सदस्य, जिल्हा परिषद.
चौकट
तीस हजार मतदारांमधून जिल्हा परिषद सदस्याची निवड होते. मतदारसंघातील लोकहिताच्या कामासाठी एखादी शिफारस सदस्यांनी केली, म्हणजे तो गुन्हेगार ठरत नाही. जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने आणि भ्रष्टाचार संपविण्यासाठी प्रशासनाला आम्ही नेहमी मदत केली आहे. यापुढेही असणार आहे, पण जिल्हा परिषद बरखास्तीची शिफारस करून अधिकाऱ्यांना काय साध्य करायचे आहे? जिल्ह्याचा विकास होणार की विकास खुंटणार आहे, याचा विचार करण्याची गरज आहे.
- अरुण राजमाने, माजी सभापती, जिल्हा परिषद
चौकट
बरखास्तीच्या प्रस्तावाचा निर्णय चुकीचा : विलासराव जगताप
जिल्हा परिषद सदस्य जनतेतून निवडून येत आहेत. ग्रामीण समस्यांची सदस्यांना जाण असल्यामुळे ते कामांची शिफारस करतात. मजूर सोसायट्यांनाच कामे देण्याचा सदस्यांनी ठराव मांडल्यानंतर अधिकाऱ्यांनी तो चुकीचा असल्याचे सांगणे गरजेचे होते. यापैकी काहीही न करता हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याप्रमाणे सभागृह बरखास्तीची शिफारस करणे योग्य नाही. अधिकाऱ्यांनी केवळ सहा सदस्यांसाठी सभागृह वेठीस धरणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिली.