येलुर फाट्यानजीक २३ लाखाचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:21 AM2020-12-26T04:21:21+5:302020-12-26T04:21:21+5:30
पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येलूर फाट्यानजीक रात्री पोलीस बंदोबस्तास होते. यावेळी कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या ...
पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येलूर फाट्यानजीक रात्री पोलीस बंदोबस्तास होते. यावेळी कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या एका ट्रकला (क्र. एमएच २१ बी. एच. ७७७४) पोलिसांनी थांबविला. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये गुटख्याची पोती आढळून आली. पोलिसांनी गुटखा व ट्रक असा ४३ लाख ७२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक अरविंद काटे, उपनिरीक्षक अनिता मेनकर, पोलीस कर्मचारी अनिल पाटील, बाजीराव भोसले, आनंदा चव्हाण यांच्यासह कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते.
चाैकट
वर्षभरातील मोठी कारवाई
कुरळपचे सहायक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांच्या पथकाने वर्षभरात केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. वर्षभरात गांजा, गुटखा, चरस अशा अमली पदार्थ जप्तीच्या कारवाईत कुरळप पोलिसांनी कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
फोटो-२५कुरळप१
फोटो ओळ-
कुरळप पोलिसांनी केलेल्या कारवाईत गुटख्याची पोती, ट्रक, चालक आणि साथीदार यांना ताब्यात घेतले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.