पेठ : हणमंतराव पाटील राजकारणात आणि समाजकरणात वेगळे पण जपणारे नेते होते. पेठच्या राजकारणात त्यांनी महत्त्वाचे स्थान निर्माण केले होते, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
पेठ (ता. वाळवा) येथील आत्मशक्ती समूहाचे शिल्पकार हणमंतराव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त नेत्ररोग शिबिरच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
माजी मंत्री शिवाजीराव नाईक, कृष्णा सहकारी बँकचे अध्यक्ष अतुल भोसले, राहुल महाडिक, सी. बी. पाटील, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी, चिमण डागे, खंडेराव जाधव, वैभव पवार, अतुल पाटील धनपाल माळी, डॉ अभिराज पाटील. डॉ. पूनम पाटील, सागर पाटील, मोहनराव मदने, सुनीता देशमाने आदी उपस्थित होते.
यावेळ २०२ नागरिकांची नेत्ररोग तपासणी करण्यात आली.
यावेळी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुरेश भोसले, संचालक लिबाजी पाटील, संजय पाटील, सभाजी पाटील, पंचायत समितीचे सदस्य आनंदराव पाटील, संपतराव पाटील, सुधाकर पाटील, हंबीरराव पाटील, प्रदीप पाटील, सतीश चराफले, उपसरपंच चंद्रकांत पवार, शंकर पाटील, नामदेव कदम, फिरोज ढगे, धनपाल माळी आदींसह मान्यवरांनी हणमंतराव पाटील यांना अभिवादन केले.
विजय पाटील यांनी स्वागत केले. फिरोज ढगे यांनी प्रस्तावना केले. नामदेव भाबुरे यांनी सूत्रसंचालन केले. शेखर बोडरे यांनी आभार मानले.